Nanded Panvel Express। पुणे : नांदेड – पुणे -पनवेल (Nanded Panvel Express Railway) पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नांदेड-पनवेल एक्सप्रेस ही रेल्वे चांगला पर्याय ठरली. मात्र, या एक्सप्रेसला मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेपेक्षा तुच्छ समजले जात आहे. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करून वेळ घालवण्यापेक्षा अन्य पर्यायांचा वापर केल्यास तुम्ही इच्छित स्थळी वेळेत पोहोचाल. (Changes in the route of Nanded-Panvel Express)
नांदेड-पनवेल एक्सप्रेस ही नेहमीच्या नांदेड, परभणी, परळी, लातूर रोड, उस्मानाबाद, कुरुडवडी, दौड, पुणे, पनवेल या मार्गावरून धावते. नांदेड येथून सायंकाळी साडेपाच वाजता निघालेली ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहा वाजता पुणे स्टेशनवर पोहोचते. त्यामुळे प्रवाशांना ही रेल्वे सोयीची ठरते. मात्र, सध्या या ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही या ट्रेनने प्रवास करणार असाल तर केवळ वेळ वाया घालवल्याशिवाय अन्य पर्याय नाही. (Changes in the route of Nanded-Panvel Express)
नांदेड-पनवेल एक्सप्रेसच्या मार्गावर कुरुडवाडी आणि दौड मध्ये रेल्वे रुळावर काम सुरू आहे. त्यामुळे नांदेड-पनवेल एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. (तात्पुरता) आता ही रेल्वे कुरुडवाडी न जाता मिरज मार्गे धावत आहे. हा मार्ग कायमचा नसल्याने मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेसाठी नांदेड-पनवेल एक्सप्रेसला थांबावं लागत आहे. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेपेक्षा एक्सप्रेसला तुच्छ समजले जात आहे. (Changes in the route of Nanded-Panvel Express)
*नांदेडमध्ये भाजपला पुन्हा झटका ; ‘हे’ नेते करणार काँग्रेसमध्ये घरवापसी*
👇👇
नांदेडमध्ये भाजपला पुन्हा झटका ; ‘हे’ नेते करणार काँग्रेसमध्ये घरवापसी
नांदेड- पनवेल एक्सप्रेस ही सकाळी सव्वा सहा वाजता पुणे तर सकाळी साडेनऊ वाजता पनवेल येथे पोहोचण्याची वेळ आहे. सकाळी सव्वा आठ वाजता वृत्त लिहीत असताना ही ट्रेन सातारा येथे पोहोचली आहे. पुण्याला पोहोचण्यासाठी अजून किमान तीन तास लागतील असा अंदाज आहे. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करायचा की नाही, हे ठरविण्याची वेळ आली आहे. (Changes in the route of Nanded-Panvel Express)
आरोग्य विभागाची परिक्षा देणाऱ्या उमेदवारांनो सावधान
आरोग्य विभागाच्या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांची परीक्षा पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे परीक्षा सकाळी दहा वाजता आहे, ही रेल्वे सकाळी सव्वा सहा वाजता पोहोचते. आपण वेळेत पोहोचू या अपेक्षेने अनेक उमेदवारांनी पुण्याला येण्याचे रिझर्व्हेशन केले आहे. मात्र, रेल्वेचा मार्ग बदलला आहे, त्यामुळे वेळेत पोहोचणे शक्य होणार नाही, त्यामुळे
आताच प्रवासाचे नियोजन करा, अन्यथा परीक्षेला मुकाल..