नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम मंजूर

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर व ख. ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केली. या अधिसुचनेद्वारे सर्व महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात 25 टक्के रक्कम आगाऊ देण्यात येते. ती मंजूर करण्यात आली आहे. (25 percent advance amount of crop insurance sanctioned to farmers)

 

यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास आगाऊ रक्कम म्हणून 25 टक्के रक्कम दिली जाते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. (25 percent advance amount of crop insurance sanctioned to farmers)

 

 

 जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीला दिलेल्या निर्देशानुसार वर नमूद पिकांसाठी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले. यामुळे नांदेड जिल्ह्यास जवळपास 400 कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. (25 percent advance amount of crop insurance sanctioned to farmers)
Local ad 1