महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोेधात गुन्हा दाखल

पुणे : वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित करीत असताना कुमशेत येथे महावितरणच्या (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात (Junnar Police Station) फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Crime against those who beat the engineers and employees of Mahavitaran)

 

Pune Municipal Corporation। शहरातील पावसाळी पूर्व कामे पुर्ण !

 

महावितरणच्या मंचर विभागातील (Department of Mahavitaran Manchar) जुन्नर उपविभाग अंतर्गत सहायक अभियंता कृष्णा कोळी (Assistant Engineer Krishna Koli) व रोहिणी आंबेकर तसेच जनमित्र सुखानंद डोणे,अजरुद्दीन शेख, कुंडलिक तळपे व योगेश अंबलकार यांच्याकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

 

 

दरम्यान कुमशेत येथील वीजग्राहक बाळासाहेब बबन डोके याच्याकडे वीज बिलापोटी ५ हजार ५९० रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित (Power outage) करण्याची कारवाई करण्यात येत होती. मात्र ‘तुम्ही इथे आलेच कसे’ असे म्हणत आरोपी बाळासाहेब डोके व सुधीर बाळासाहेब डोके यांनी मोठ्या आवाजात शिविगाळ सुरु केली. सहायक अभियंता कृष्णा कोळी व जनमित्रांना धक्काबुक्की, मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणला.

 

या प्रकरणी महावितरणकडून जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जुन्नर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हे दाखल (Crimes registered under section 353, 323, 504, 506 and 34) केले असून पुढील पोलीस तपास सुरु आहे.

Local ad 1