पोल्ट्री उद्योगाच्या नावाखाली बनावट मद्य कारखान्याचा पर्दाफाश
पुणे ः दौंड तालुक्यात पोल्ट्री उद्योगाच्या नावाखाली बनावट मद्य (Artificial alcohol) उत्पादनाचा कारखान्याचा पर्दाफाश उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) केला आहे. याठिकाणावरुन मद्य तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे बेकायदा मद्यसाठा आणि उत्पादन करणार्यांचे दाबे दणाणले. (Exposing fake liquor factory under the name of poultry industry)
कैलास सुदाम घुंगुर्डे (वय 24 वर्षे, रा. जिल्हा परिषद शाळेमागे, कानगाव, ता. दौंड, जि. पुणे) (वाहन चालक) व मोहन जगन्नाथ सूळ, (वय 33 वर्षे, रा. तामखडा, पाटस, ता. दौंड, जि. पुणे.) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत. (Exposing fake liquor factory under the name of poultry industry)
Related Posts
दौंड तालुक्यातील कानगाव गावच्या हद्दीत, गार रोडवर, घोगरे वस्ती लगत, कच्च्या रस्त्यावरून बनावट देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने रात्री दीड वाजता एका वाहन चालकाला थांबविण्यासाठी इशारा केला. वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये बनावट देशी दारूच्या 144 सीलबंद बाटल्या व मारुती सुझुकी एसएक्स 4 चारचाकी गाडी क्र. एमएच 02 बी पी 2758 जप्त केले. (Exposing fake liquor factory under the name of poultry industry)
आरोपीकडे चौकशी केली असता, त्यांने जिरेगाव गावच्या हद्दीत, सर्व्हे नं.358, गरदडे यांच्या कुकुटपालन पोल्ट्री शेडमध्ये, लाळगेवाडी, ता. दौंड, जि. पुणे येथून आणल्याचे सांगितले. सदर ठिकाणाची झडती घेतली असता, त्याठिकाणी 510 लि. मद्यार्क, बनावट विदेशी मद्य 36.72 लि., बनावट देशी दारू 69.12 लि. व दोन बॉटल सिलिंग मशीन असा बनावट देशी विदेशी मद्य तयार करण्याचा 2 लाख 88 हजार 350 किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. (Exposing fake liquor factory under the name of poultry industry)
आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता पुढील तपासाकरिता 3 दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदरची कारवाई विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक एस.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही.बी.ढवळे, उपनिरीक्षक एस.के. कान्हेकर, आर. आर. वाघ, दीपक सुपे, सहा. दु.नि. आर.एस.मासळकर, सागर दुर्वे, जवान सी.डी. इंगळे, एम.एम. गवळी, एस.डी. गायकवाड, तात्या शिंदे यांचा पथकात सहभाग होता. (Exposing fake liquor factory under the name of poultry industry)