(Goa-made liquor stocks seized in Pune) पुण्यात गोवा निर्मित मद्यासाठा जप्त

पुणे ः दौंड तालुक्यातील कानगांव-हातवळण रस्त्यावर प्राथमिक शाळेजवळ एका संशयित वाहनाच्या तपासणीत गोवा बनावटीचा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणेच्या जी विभागाने केली. (Goa-made liquor stocks seized in Pune)

या प्रकरणात प्रशांत अरूणराव भोर, (वय 31 वर्ष रा.काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या आरोपिला अटक करण्यात आली. (Goa-made liquor stocks seized in Pune)

राज्य उत्पादन शुल्क, जी विभागाच्या अधिकार्‍यांना गोवा निर्मित मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कानगांव-हातवळण रस्त्यावर सापळा लवण्यात आला. संशयित एमएच 17 ए.जी 5724 क्रमांकाच्या कार चालकाला थांबून तपासणी केली असता, त्यात गोवा निर्मित मद्याचे 17 बॉक्स मिळून आले. तसेच कार जप्त करण्यात आली असून, एकूण दोन लाख 43 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Goa-made liquor stocks seized in Pune)

ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक, संजय जाधव व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक एस. के. कान्हेकर यांनी केली. तसेच निरीक्षक बी.व्ही. ढवळे, दुय्यम निरीक्षक विकास थोरात, सतीश काळभोर, तसेच जवान चंद्रकांत इंगळे, मोहन गवळी, सोहन मालुसरे, नवनाथ पडवळ, वाहनचालक, प्रमोद खरसडे यांनी सहभाग घेतला. (Goa-made liquor stocks seized in Pune)

Local ad 1