Liquor stock seized । पाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात 52 लाखांचा मद्यसाठा जप्त ; दिवाळीतच निघालं मद्य तस्करांच दिवाळ

Liquors tock seized । पुणे : सर्वजण दिवाळी साजरी करण्याच्या मूडमध्ये आहेत. ही संधी पाहून मद्य तस्कराने गोवा राज्यात निर्मित झालेल्या मद्याची वाहतूक करण्याचा बेत आखला. परंतु, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणेच्या डी विभागाने दिवाळीत मद्य तस्कराच पाडव्याच्या मुहूर्तावर दिवाळ काढलं. तब्बल 52 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करून दिवाळ काढलं आहे. मुद्देमलासह एका आरोपीला अटक केली आहे. (52 lakh liquor stock seized in Goa; Excise action in Pune) 

 

 

 

कृष्णा तुळशीराम कांदे (वय ३० वर्षे, रा. मु. अंबील वडगाव, पोस्ट पोथरा ता. बीड, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विराधात मुबंई दारूबंदी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (52 lakh liquor stock seized in Goa; Excise action in Pune)

 

 

 

पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाचे निरीक्षक संजय अधिकाऱ्यांना वारजे माळवाडी, परिसरात गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संजय डेरे यांनी वारजे माळवाडी उड्डाणपुलावर सापळा लावला. संशयित चारचाकी वाहन क्र. MH ०९ FL२९४८ या थांबवून झडती घेतली. त्यात १८० मि.लि. क्षमतेच्या इंपिरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या (पेरनॉड रिकार्ड इंडिया प्रा. लि. नाशिक निर्मित) फक्त गोवा राज्याकरीता विक्रीसाठी असलेले एकूण ६ हजार ९६० सिलबंद बाटल्या (एकूण १४५ बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ४८ बाटल्या प्रमाणे) अंदाजे किंमत 10 लाख 40 हजार,

 

१८० मि.लि. क्षमतेच्या मॅकडॉल नं. १ रिझर्व्ह व्हिस्की ओरीजनल (युनायटेड स्पिरीट लि. चे मांडवी डिस्टलरीज अॅन्ड ब्रूवरिज प्रा. लि. मडकेम इंडस्ट्रीयल इस्टेट गोवा निर्मित) फक्त गोवा राज्याकरीता विक्रीसाठी असलेल्या १२ हजार २४० सिलबंद बाटल्या (एकूण २५५ बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ४८ बाटल्या प्रमाणे) अं. किं. रु. १९ लाख ५८ हजार ४०० रुपये, ७५० मि.लि. क्षमतेच्या एड्रीअल क्लासिक व्हिस्की (ब्ल्यू मून डिस्टलरीज, कनकोलीम इंडस्ट्रीयल इस्टेट सालसेटे, गोवा निर्मित) फक्त गोवा राज्याकरीता विक्रीसाठी असलेल्या ६०० सिलबंद बाटल्या (एकूण ५० बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये १२ बाटल्या प्रमाणे) अं. किं. रु.२ लाख ४० हजार रुपये, असे एकूण ४५० बॉक्स ज्याची एकूण अंदाजे किंमत ५२।लाख ४२ लाख ४०० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; पीक विम्याची रक्कम सोमवारी होणार बँक खात्यावर जमा

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, पुण्याचे अधीक्षक संतोष झगडे, बीडचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभागातील, संजय डेरे, निरीक्षक, शगणेश केंद्रे, दुय्यम निरीक्षक, योगेंद्र लोळे, दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, स. दु. नि. व जवान समीर पडवळ, महेश बनसोडे, श्राजू पोटे, वाहन चालक अभिजित सीसोलेकर इत्यादींनी सदर कारवाईत भाग घेतला. (32 lakh liquor stock seized in Goa; Excise action in Pune)

 

Local ad 1