दयाराम राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिम्मित आरोग्य मदत केंद्राचे उद्घाटन

पुणे : मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता म्हणजेच ताडीवाला रोड (Tadiwala Road) येथे लोकनेते दयाराम राजगुरू चारीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि नगरसेविका लताताई राजगुरू यांच्या पुढाकाराने रुग्ण हक्क परिषद (rugna hakka parishad) आरोग्य केंद्राचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे (Former Minister of State for Home Affairs Ramesh Bagwe) यांच्या हस्ते झाले. (Inauguration of Health Assistance Center)

 

 

या वेळी दिवंगत लोकनेते दयाराम राजगुरू (नाना) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून रुग्णांच्या न्याय हक्कासाठी कायदा झालाच पाहिजे, यासाठी राज्यात रुग्ण हक्क चळवळ उभी राहत आहे. त्याबरोबरच हजारो गोरगरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिकांना देखील दर्जेदार उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  (Inauguration of Health Assistance Center)

 

रुग्णहक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी महापौर रजनीताई त्रिभुवन, माजी गटनेते अरविंद शिंदे, राहुल तायडे, पापा परदेशी, सोन निकाळजे, निलेश आल्हाट, दीपक गायकवाड, प्रताप शिर्के, जमसुभाई शेख, निलेश शिरोळे आदी उपस्थित होते.(Inauguration of Health Assistance Center)

 

 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले. तर आभार कुणाल राजगुरू यांनी मानले. (Inauguration of Health Assistance Center)
Local ad 1