किमान आधारभूत किंमत जाहीर, धान खरेदी केंद्रांना मंजुरी, कोणत्या धान्याला किती दर जाणून घ्या..
नांदेड : किमान आधारभूत किंमत (Minimum base price) खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2021-22 साठी धान खरेदी केंद्रास मंजूरी देण्यात आली आहे. बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये धान खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन (Of Maharashtra State. Op. Marketing Federation) मुंबई (मार्केटींग फेडरेशन) या अभिकर्ता संस्थेची मुख्य अभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बिलोली तालुका खरेदी विक्री संघ अंतर्गत बिलोली (कासराळी) या खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. धान या पिकासाठी खरीप पणन हंगाम (रब्बी / उन्हाळी) गुरूवार 30 जून 2022 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. (Approved grain procurement centers under MSP)
- महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी (नियम 1963 च्या नियम 32 (ड) अन्वये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात केंद्र शासनाच्या किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या उत्पन्नाची कमी भावाने खरेदी केली जाणार नाही. याबाबत बाजार समितीने दक्षता घ्यावी. याबाबत बाजार समितीने आळा घातला नाही तर त्यांच्या विरुध्द उपरोक्त नियमांच्या नियम 45 अन्वये योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. (Approved grain procurement centers under MSP)
- लाभार्थ्याचे प्रदान ऑनलाईन करण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत. ही बाब विचारात घेता अभिकर्ता संस्थानी त्यांच्या मुख्यालयातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरेदी केलेल्या व धानाची रक्कम अदा करावी. खरेदी अभिकत्यांनी या योजनेतर्गंत खरेदी केल्या जाणाऱ्या धानासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांची प्रती इतर मुळ अभिलेखे त्यांच्या कार्यालयात ठेवावे. (Approved grain procurement centers under MSP)
धानाची साठवणूक व भरडाई

