...

Inamdar Sports Award 2026। डॉ. पी. ए. इनामदार व आबेदा इनामदार जिल्हास्तरीय क्रीडा उत्कृष्टता पुरस्काराने खेळाडू सन्मानित

 

Inamdar Sports Award 2026। पुणे, दि. १० एप्रिल २०२६ : क्रीडा, शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी युवा प्रतिभेचा गौरव करणारा तृतीय डॉ. पी. ए. इनामदार व आबेदा इनामदार जिल्हास्तरीय क्रीडा उत्कृष्टता पुरस्कार २०२५–२६ सोहळा आझम कॅम्पस येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात क्रिकेट, फुटबॉल, तिरंदाजी, स्केटिंग, कबड्डी, सॉफ्टबॉल, हॉकी, पॅरा बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि पॅरा ऍथलेटिक्स अशा विविध क्रीडा प्रकारांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल २० खेळाडूंचा (१० मुलगे व १० मुली) सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.सी.ई. सोसायटीच्या अध्यक्षा आबेदा पी. इनामदार उपस्थित होत्या.

 

आता ‘डिप्युटेशन राज’ संपणार? महसूल विभागाचे नवे नियम लागू

 

यावेळी बोलताना आबेदा पी. इनामदार म्हणाल्या, “क्रीडा शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण करते. लहान वयातच योग्य सन्मान मिळाल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळावी, यासाठी संस्थांची जबाबदारी महत्त्वाची आहे.” या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता शैक्षणिक व करिअर क्षेत्रातील यशाचाही गौरव करण्यात आला. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पाच विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 

एम.सी.ई. सोसायटीच्या आझम स्पोर्ट्स अकॅडमी व दिशा स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या पोलीस प्रशिक्षण उपक्रमातील विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांनी शासकीय व गणवेशधारी सेवांमध्ये प्रवेश मिळवला आहे.

 

यामध्ये नानासो घाटगे (पोलीस उपनिरीक्षक), ओंकार फाटे (चॅरिटी निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक), पियुष सुपेकर (विक्रीकर निरीक्षक व सहाय्यक वनसंरक्षक), पूजा आखाडे व तेजस थोरात (पिंपरी-चिंचवड पोलीस दल) यांचा समावेश आहे.

 

टँकर अपघातांवर लगाम : पुणे मनपा आणणार कडक नियम, SCADA सक्तीचे

 

 

‘बेस्ट स्पोर्ट्स टीचर’ पुरस्कार अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे क्रीडा शिक्षक माजिद सय्यद यांना प्रदान करण्यात आला.

 

कार्यक्रमास एम.सी.ई. सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष मोहम्मद आरिफ चौधरी, सदस्य अफजल खान, साबिर शेख, दिशा करिअर अकॅडमीचे संचालक दत्तात्रय सरडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. गुलजार शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन दिलशाद सय्यद व अमजद पठाण यांनी केले.

 

पुरस्कार विजेते (मुले)
* मोहम्मद अरकम सय्यद – क्रिकेट
* हर्ष संदीप उतेकर – फुटबॉल
* द्विज सोलंकी – तिरंदाजी
* अवनीश गुंजाळ – स्केटिंग
* शुभम शेलके – कबड्डी
* स्वप्नील गडदे – सॉफ्टबॉल
* निराज लांडगे – हॉकी
* मोहम्मद यासीन – पॅरा बॅडमिंटन
* लौकिक मेलगे – ऍथलेटिक्स
* राजवीर सूर्यवंशी – बॉक्सिंग

 

पुरस्कार विजेते (मुली)
* गौतमी नाईक – क्रिकेट
* म्युरिएल अ‍ॅडम – फुटबॉल
* प्रचिती लागडे – स्केटिंग
* ऐश्वर्या बोडके – सॉफ्टबॉल
* मैथिली भुजबळ – हॉकी
* अकुताई उलभागत – पॅरा ऍथलेटिक्स
* हिमाली कांबळे – वेटलिफ्टिंग
* श्रेया महाजन – स्केटिंग
* साखी बोराडे – ऍथलेटिक्स
* काव्या माघडे – तिरंदाजी

 

 

 

Local ad 1