पुणे महापालिकेचे क्रीडा धोरण तयार करण्याचे काम सुरू | PMC Sports Policy
इतर महापालिकांची नियमावली घेतली जातेय अभ्यासासाठी
पुणे, दि. २८ जून : पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाने शहरातील क्रीडा संकुल, जलतरण तलाव आणि व्यायामशाळा यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इतर महापालिकांनी कोणती नियमावली अवलंबलेली आहे, याचा अभ्यास केला जात आहे, अशी माहिती उपायुक्त किशोरी शिंदे यांनी दिली. (pmc sports policy guidelines pune)
पुण्यात ६० रस्त्यांची डीप क्लीन मोहीम | PMC Deep Clean Drive July 2025
आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार हे धोरण पुन्हा सक्रिय करण्यात आले असून, भाडे दर कमी करणे, पात्र व्यक्तींना प्राधान्य देणे, यांसारखे मुद्दे धोरणात समाविष्ट असतील.
Big Breaking News। भीमाशंकर विकास आराखड्याला मंजुरी ; हेलीपॅडसह रस्त्यांचा होणार विकास
महापालिकेच्या विविध क्रीडा सुविधा अनेक ठिकाणी निष्क्रिय असून, काही जलतरण तलाव केवळ उन्हाळ्यात चालवले जातात. अनेक व्यायामशाळा पूर्ण बांधूनही अद्याप सुरु झालेल्या नाहीत. पूर्वीही सभागृहात यावर चर्चा झाली असून, भाडे आणि देखभाल खर्च यामध्ये तफावत असल्यामुळे अनेक संस्थांना सुविधा चालवणे परवडत नाही.
पुण्यात ६० रस्त्यांची डीप क्लीन मोहीम | PMC Deep Clean Drive July 2025
तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे यासंदर्भातील प्रारूप धोरण पाठविण्यात आले होते. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक यांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव आहे.
दरवर्षी रेडीरेकनरनुसार भाडे वाढत असले तरी महापालिकेच्या सेवा दरात गेल्या ११ वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सेवा दरात सुधारणा करण्याची मागणीही होत आहे.