राज्यातील दहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाला कोणती मिळाली जबाबदारी

IAS Transfer : राज्यातील आयएएस अधिकारी व इतर शासकीय  अधिकाऱ्यांच्या शासकीय बदल्या होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचे आज येणार-उद्या येणारी अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरु आहे. मंगळवारी राज्यातील दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचे बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (IAS Transfer : Transfers of ten IAS officers in the state)

 

 

राज्य सरकारने आज दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली (IAS Transfers) केली आहे. आज झालेल्या बदल्यांमध्ये जी श्रीकांत (G Sreekanth) हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पी शिवशंकर (P Shivshankar) यांना शिर्डी संस्थानचे (Shirdi Sansthan CEO) नवे सीईओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात आपल्या कार्यशैलीने सर्वाधिक चर्चेत असलेले तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना अखेर नवीन जबाबदारी मिळाली आहे. कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (IAS Transfer : Transfers of ten IAS officers in the state)

मराठी चित्रपटला स्क्रिन न मिळणे आणि त्यातून होणारे सामाजिक नुकसान.. यावर प्रा. तुषार रुपनवर यांनी लिहिलेला लेख..

1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. नितीन करीर (IAS Officer Dr. Nitin Karir) हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (IAS Transfer : Transfers of ten IAS officers in the state)

 

 

1992 च्या बॅचचे अधिकारी मिलिंद म्हैसकर (IAS officer Milind Mhaiskar) यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1994 च्या बॅचचे अधिकारी डी.टी.वाघमारे (DT Waghmare) यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 1995 च्या अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी (IAS officer Radhika Rastogi) यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या (Department of Minority Development) प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (IAS Transfer : Transfers of ten IAS officers in the state)

 

 

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी  श्रावण हर्डीकर (IAS officer Shravan Hardikar) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे IAS officer Tukaram Mundhe), कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  (Big news: Transfers of ten IAS officers in the state)

 

 

2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी जी. श्रीकांत (IAS Officer G. Srikanth) हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून जबाबदारी आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी (IAS Officer Dr. Abhijit Chaudhary) यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पी. शिव शंकर (IAS Officer P. Shiva Shankar) यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट (Shree Saibaba Sansthan Trust), शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे.

Local ad 1