राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती

IPS Officer Transfers : गृह विभागाकडून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. तर काहींना पदोन्नती देत बदल्या करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता (Chhatrapati Sambhajinagar Police Commissioner Nikhil Gupta) यांच्या जागी पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया (Pimpri-Chinchwad Joint Commissioner of Police Manoj Lohia) यांची बदली करण्यात आली. तर निखील गुप्ता यांची बदली कुठे केली हे स्पष्ट करण्यात आले नाही. (Transfers and promotions of IPS officers in the state)

 

Transfers and promotions of IPS officers in the state 1

 

ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह (Thane Police Commissioner Jaijit Singh) यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सोबतच दहशतवाद विरोधी पथकाचे अपर महासंचालक सदानंद दाते  (Additional Director General of Anti-Terrorism Squad Sadanand Date) आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अपर महासंचालक बिपीन कुमार सिंह (Additional Director General of Financial Offenses Branch Bipin Kumar Singh) यांना देखील पदोन्नती देण्यात आली. (Transfers and promotions of IPS officers in the state)

 

 

Transfers and promotions of IPS officers in the state 2

गृह विभागाने काढलेल्या बदलीच्या यादीत छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त पदावर पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावरून निखील गुप्ता हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. (Transfers and promotions of IPS officers in the state)

 

 

Transfers and promotions of IPS officers in the state 3

 

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान याचवेळी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन यांची देखील बदली करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन यांची मुंबई विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता बृहन्मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डी.एस. चव्हाण यांच पदोन्नती होऊन बदली करण्यात आली आहे.

 

Transfers and promotions of IPS officers in the state 4

Local ad 1