HSC Result 2026 Maharashtra पुणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC) १२ वी परीक्षेला बसलेल्या १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. DigiLocker च्या अधिकृत वेबसाईटवर “Class 12th Result 2026 Coming Soon” असा संदेश दिसू लागला आहे. यावरून निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सामान्यतः निकाल जाहीर होण्यापूर्वी तांत्रिक पडताळणीसाठी अशा प्रकारची अपडेट दिली जाते. त्यामुळे आता निकाल जाहीर होण्यास फार विलंब लागणार नसल्याचे मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल मे 2026 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. काही अहवालांनुसार १३ मे ते २५ मे दरम्यान निकाल लागू शकतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे.
अधिकृत संकेतस्थळ
* mahresult.nic.in
* hscresult.mkcl.org
* results.digilocker.gov.in
* Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ची अधिकृत वेबसाईट
महाराष्ट्र बोर्ड विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अशा सर्व शाखांचे निकाल एकाच वेळी जाहीर करणार आहे. मागील वर्षी विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५ टक्के लागला होता. यंदाही निकालाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

