गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या वतीने ईदनिमित्त सुका मेवा वाटप

पुणे : मुस्लिम बांधवाच्या ईदनिमित्त गुल टेकडी एकता प्रतिष्ठानच्या वतीने सुका मेवाचे किट वाटप करण्यात आले.गुल टेकडी एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेरला, महिला अध्यक्षा स्वाती शेरला, माजी नगरसेवक रघुनाथ गौडा यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देत सुका मेव्याचे वाटप केले. (Distribution of dry fruits on the occasion of Eid on behalf of Gultekdi Ekta Pratishthan)

 

 

महिनाभर कडक उपवास केल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद खुललेला दिसतो. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना संपला आणि सर्वत्र ईद साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून मोठ्या उत्साहात आणि शांततेत ईद साजरी करण्यात आली.  (Distribution of dry fruits on the occasion of Eid on behalf of Gultekdi Ekta Pratishthan)

 

यावेळी स्वारगेट पोलीस स्टेशनचे दीपक जमदाडे, सचिन खंडागळे, महेश साळुंखे, सलमान शेख, सोयल बागवान, मुन्नाभाई मुलानी, फिरोज खान, रूपेश राजभर, नझीर शेख, सागर नराल उपस्थित होते. (Distribution of dry fruits on the occasion of Eid on behalf of Gultekdi Ekta Pratishthan)
Local ad 1