एकता सेवा प्रतिष्ठान चा पुढाकार “एक पोळी गोर गरिबांच्या मुखी”

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. होळी निमित्त “एक पोळी गोर गरिबांच्या मुखी”असा उपक्रम राबविण्यात आला. (Ekta Seva Pratishthan’s initiative “Ek Poli Gor Garibara Mukhi”)

 

 

एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुलटेकडी, इंदिरानगर, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, महर्षीनगर मुकुंदनगर वस्ती आदी भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्वाती शेरला, कोमल साळुंखे, ज्योती जगताप, सोनाली खंडागळे, जया सांळुखे आदी महिलांनी होळीच्या निमित्ताने  “एक पुरण पोळी गोर गरिबाच्या मुखात” असा सामाजिक संदेश देत सातशे ते आठशे पोळ्या संकलन केल्या आहेत.

 

 

जमा झालेल्या पोळी गणेश शेरला (Ganesh Sherala) व सहकार्यांच्या हस्ते स्वारगेट वेगा सेंटर व साईबाबा मंदीरासमोर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन  गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. (Ekta Seva Pratishthan’s initiative “Ek Poli Gor Garibara Mukhi”)

 

 

यावेळी स्वाती शेरला, दत्ता सोनार, मारूती कांबळे, अमोल आरकल, रुपेश राजभर , महेश सांळुखे, नझीर शेख, देवेद्र मांडवे, अक्षय मदने यांचा सहभाग होता. (Ekta Seva Pratishthan’s initiative “Ek Poli Gor Garibara Mukhi”)

Local ad 1