FIFA World Cup 2022 : इंग्लंडची इराणवर 6-2 च्या फरकाने मात

इंग्लंड संघाने इराणला 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली

Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) इंग्लंड विरुद्ध इराण (England vs Iran) सामना झाला. यामध्ये इंग्लंड संघाने इराणला 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली. इंग्लंडच्या बी. साका याने सर्वाधिक दोन गोल केले. तर इराण संघाकडून मेहदी तरेमी यानेच दोन गोल केले. (FIFA World Cup 2022 England beat Iran by 6-2)

विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने 16 व्या वेळेस स्पर्धेत सहभाग मिळवला आहे. तर इराणचा संघ सहाव्यांदा स्पर्धेत सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही पहिल्यांदाच मैदानात एकमेंकाविरुद्ध आमने-सामने आले होते. (FIFA World Cup 2022 England beat Iran by 6-2)

 

दरम्यान सामना इंग्लंडने जिंकल्याने हेड टू हेड रेकॉर्डमध्ये इंग्लंड 1-0 ने आघाडीवर पोहोचला आहे. सामन्याचा विचार करता इंग्लंड संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. 35 व्या मिनिटाला जुड बेलिंगहमने गोल करत संघाचं खातं उघडलं. त्यानंतर 43 व्या मिनिटाला साकाने गोल केला तर रहीम स्टर्लिंगने हाल्फ टाईम नंतर मिळालेल्या एक्स्ट्रा वेळेत गोल केल्यामुळे हाल्फ टाईमपूर्वी 3-0 ची मोठी आघाडी घेतली. (FIFA World Cup 2022 England beat Iran by 6-2)

हाल्फ टाईमनंतर 65 व्या मिनिटाला इराणच्या मेहदी तरेमीने गोल केला. पण इराण आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करणार तोवरच 71 स्टार खेळाडू मार्कस रॅशफोर्डने गोल करत इंग्लंडची आघाडी वाढवली. 89 व्या मिनिटाला जॅक ग्रेयलिशने आणखी एक गोल करत इंग्लंडची आघाडी तब्बल 6 गोल केली. ज्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये (90+1) इराणकडून मेहदी तरेमीने पेनल्टी वर गोल केल्यामुळे इराणने 6-2 अशा फरकाने सामना गमावला.
Local ad 1