...

पुणे तिथे काय उणे ! सुनेच्या कपटी कारस्थानातून व्यापारी कुटुंबाची सुटका !

डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांचा अचूक तपास चर्चेत

पुणे : पुण्यातील एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबाची सुटका सुप्रसिद्ध खाजगी गुप्तहेर डिटेक्टिव्ह प्रिया काकडे* यांच्या अचूक आणि प्रभावी तपासामुळे झाली आहे. या प्रकरणात घरातील लहान सुनेने सासू-सासऱ्यांना आणि इतर कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या देऊन त्रास दिल्याचे उघड झाले. तपासाअंती ती आपल्या प्रियकरासोबत दिवसा घरात अनैतिक सबंध ठेवत असल्याचेही समोर आले. (detective priya kakade pune business family case)

 

कुटुंबात वृद्ध दाम्पत्य, त्यांचे दोन पुत्र आणि दोन सुना असा परिवार राहत होता. का ही महिन्यांपासून वृद्ध दाम्पत्याला झोप न लागणे, अंगात अशक्तपणा जाणवणे असे प्रकार सुरू झाले. फॅमिली डॉक्टरांकडे तपासणी केली असता त्यांच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे प्रमाण आढळले. त्यानंतर घरात चोरीची प्रकरणे ही समोर येऊ लागली. या सर्व घटनांमुळे संशय नव्या सुनेवर गेला.

 

पुरावे न मिळाल्याने कुटुंबाने स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन संचालिका प्रिया काकडे यांची मदत घेतली. त्यांनी अत्यंत गोपनीयरीत्या तपास करत, सुनेशी मैत्री करत पुरावे गोळा केले. तपासात उघड झाले की ती दररोज सकाळच्या नाष्ट्यात झोपेच्या गोळ्या मिसळत असे आणि नंतर आपल्या प्रियकराला घरात बोलावत असे.

 

पुरावे पाहून कुटुंबीयांनी सुनेला सामोरे घेतले असता तिने सुरुवातीला नकार दिला, मात्र पोलिस तक्रारीची भीती दाखवल्यावर अखेर सर्व कबूल केले. त्यानंतर समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रकरण निकाली काढण्यात आले. चोरी गेलेले दागिने आणि पैसे परत मिळाले, तसेच संबंधित मुलाचा घटस्फोट घेऊन कुटुंबाने या अध्यायाला पूर्णविराम दिला.

 

डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्या तांत्रिक कौशल्य आणि संवेदनशील दृष्टिकोनामुळे निष्पाप कुटुंब वाचले. त्यांनी सांगितले, “अशा प्रकरणांमध्ये केवळ शंका पुरेशी नसते, ठोस पुरावे मिळवणे अत्यावश्यक असते. सत्य नेहमी समोर येतेच.” ही घटना पुण्यात चर्चेचा विषय ठरत असून, समाजात विश्वासाबरोबरच सावधगिरी आवश्यक असल्याचा संदेश देऊन जाते.

 

 

Local ad 1