Heavy rain in Pune  : अग्निशमन दलाकडून 12 जणांची सुखरूप सुटका

पुणे : सोमवारी रात्री पुणे शहर आणि जिल्ह्यात आथिवृष्टी झाली. त्यात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. शहारात  विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या (Fire brigade) नियंत्रण कक्षात (Control Room) नोंद झाल्या असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकुण १२ जणांची सुखरुप सुटका केली आहे. (Heavy rain in Pune  : 12 people rescued by fire brigade)

अग्निशमन दलाकडे सोमवारी (Monday) रात्री दहा वाजेपासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. तर मंगळवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकुण २० (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एन आयबीएम रोड – रास्ता पेठ, दारूवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मित्रमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ तसेच एक ठिकाणी पाणी जमाल्याची माहिती समोर आली होती.

गायमुखवडी पिंपरी येथे ढगफुटीची रात्री दोन वाजता पाहणी करताना तहसीलदार आणि गटविकास अधिकारी
गायमुखवडी पिंपरी येथे ढगफुटीची रात्री दोन वाजता पाहणी करताना तहसीलदार आणि गटविकास अधिकारी

सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती,रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी तीन ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते. (Heavy rain in Pune: 12 people rescued by fire brigade)

मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले. यामधे तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले व याचा विडीओ सोशल मिडियावर बराच प्रसिद्ध झाला.

कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली. (Heavy rain in Pune: 12 people rescued by fire brigade)

Local ad 1