पुणे,सोशल मिडियावर विशेषतः whatsapp वर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या निवासी मालमत्तेवर ३०% मालमत्ता कर सवलत मिळते, अशा प्रकारचे संदेश प्रसारित होत आहेत. सदर संदेशामध्ये नमूद केलेली माहिती अचूक नसून, कोणत्याही अधिकृत शासन निर्णयावर आधारित नाही, असे महापालिकेच्या कर विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर विशेषतः whatsapp वर फार्वड होणार मॅसेज हा फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Related Posts
पुणे महापालिकेतील कर विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये अशा प्रकारची ३०% सरसकट सवलत देण्याबाबत कोणताही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. तसेच, अशा सवलतीसाठी कोणतीही राज्यस्तरीय योजना अस्तित्वात नाही.ज्येष्ठ नागरिकांनी अशा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे अवाहन केले आहे.
मालमत्ता कर सवलती संदर्भातील कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या नजिकच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. सोशल मिडियावर प्रसारित होत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याने नागरिकांनी ती पुढे पाठवू नये, तसेच अफवांपासून सावध राहावे असे आवाहन केले आहे.
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

