Gst ची १०२ कोटींची बनावट खरेदी बिले बनवणारा व्यापारी गजाआड

मुंबई : महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाने जवळपास १०२ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टैक्स क्रेडिट (Input tax credit) घेऊन शासनाच्या १४ कोटींच्या कर महसुलाची हानी करण्या-या व्यापाऱ्याला अटक केली आहे. (A businessman who made fake purchase bills of Rs 102 crore for GST has been arrested)

 

 

मे. समिक्स पुरवठादार व्यापा-यांकडून ८ कोटींचा महसुल मिळविण्यात महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागास यश आले आहे. (Maharashtra Goods and Services Tax Department)
मे. समिक्स विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमे अंतर्गत मे. समिक्स या कंपनीचे प्रोप्रायटरला 7 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली. (A businessman who made fake purchase bills of Rs 102 crore for GST has been arrested)

 

 

दंडाधिका-यांनी या व्यापा-यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई सहाय्यक राज्यकर आयुक्त अमोल सुर्यवंशी यांनी निळकंठ एस. घोगरे, राज्यकर उपआयुक्त व राहुल व्दिवेदी (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण अ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली केली. (A businessman who made fake purchase bills of Rs 102 crore for GST has been arrested)

 

 

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधानांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभाग कर चुकवणा-या व्यापा-यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणा-यांना कडक इशारा दिलेला आहे. (A businessman who made fake purchase bills of Rs 102 crore for GST has been arrested)

Local ad 1