पुणे तिथे काय उणे..! ‘सेक्स तंत्र’ प्रशिक्षण शिबीर ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा  

Pune News : पुण्यात येत्या १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान सेक्स तंत्र नावाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी १५ हजार इतके शुल्क ठेवण्यात आले आहे. या संदर्भात एक जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. (Sex Tantra Camp, There was a lot of discussion on social media)

 

 

 

पुणे तिथे काय उणे या म्हणीचा प्रत्यय पुण्यात नेहमीच येत असतो. पुण्यात ‘सेक्स तंत्र’ नावानं एक प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येणार आहे. येत्या १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात हे शिबीर होणार आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती तब्बल १५ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ( (Sex Tantra Camp, There was a lot of discussion on social media)

 

 

व्हायरल होत असलेली जाहिरात

 

नवरात्री उत्सवाच्या प्राश्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लैंगिक शिक्षणाची गरज अधोरेखित करण्याचा हा प्रकार असल्याचे भासवले जात आहे. मात्र या जाहिरातीमधून वेगळाच प्रकार असल्याचे प्रतीत होत आहे. कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्यासह अनेकांनी यावर आक्षेप घेत पुण्यात नक्की चाललंय तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

 

दरम्यान, हे पुण्यात होऊ देणार नाही, असे हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितले. पुणे शहर पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी दुपारी 12 वाजता या बाबतचे निवेदन देण्यासाठी जाणार असून या विकृती ला रोखण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते आम्ही करू, असे स्पष्ट केले आहे. ( (Sex Tantra Camp, There was a lot of discussion on social media)

Local ad 1