पुणे – पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या (Pune Contractors Association) वतीने अभियंता दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागातील उत्कृष्ठ अभियंता पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण (Atul Chavan, Chief Engineer of Public Works Pune Department) व अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर (Superintending Engineer Bappa Bahir) यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आले. (Best Engineer Award Distribution on Engineer’s Day)
कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, उपअभियंता राजेसाहेब आगळे, योगेश भंडलकर, शाखा अभियंता तेजेश्री देशमुख, सानू सोनकांबळे, शशिकांत तुपे व वरिष्ठ लिपिक नर्गिस शेख यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संघटनेच्या वतीने अष्टविनायक परिक्रमा मार्ग पूर्ण केल्याबद्दल मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. (Best Engineer Award Distribution on Engineer’s Day)
रवींद्र भोसले म्हणाले की, चांगल्या कामासाठी ऊर्जा देऊन जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पुरस्कार देण्यात येतात. कंत्राटदार संघटनेतर्फे दरवर्षी हे पुरस्कार दिले जात असून चांगले काम करणाऱ्या अभियंत्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी केले. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता सूरेंद्र काटकर, उज्वला घावटे, अमोल पवार, विनय कुलथे, संजय वागज व मोठ्या संखेने अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार उपस्थित होते.