पुणे अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने यांचा मुंबईत गौरव
मुंबई : अन्नधान्य वितरणातील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आधार सिडींग (aadhar seeding) बंधनकारक करण्यात आले असून, उल्लेखनिय कामगिरी केलेल्या त्यात पुणे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेखा माने (Food Grain Distribution Officer Surekha Mane) आणि सोलापूर शहर अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे (Food Grain Distribution Officer Sumit Shinde) यांचा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण (Food Civil Supplies Minister Ravindra Chavan) यांनी सन्मान केला. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी राज्याचे पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे (Supply Department Principal Secretary Vijay Waghmare), पुणे विभागाचे उपायुक्त पुरवठा डॉ.श्री त्रिगुण कुलकर्णी (Pune Division Deputy Commissioner Supply Dr. Shri Trigun Kulkarni) रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी (Ganesh Dangi) उपस्थित होते. (Pune food grain distribution officer Surekha Mane honored in Mumbai)
रास्त भाव दुकानदारांच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी विभागात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पुणे विभागातील उर्वरित पाच कार्यालये 100% आधार सिडींग पूर्ण केले जाईल, अशी माहिती डॉ कुलकर्णी यांनी दिली.रास्त भाव दुकानदारांना वारंवार येणाऱ्या Epos मशीन च्या अडचणीबाबत ही लवकरच मार्ग काढण्यात येईल, रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. (Pune food grain distribution officer Surekha Mane honored in Mumbai)