आंतरराष्ट्रीय व्यवसायातून मोठा वाटाकंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायानेही महसुलात महत्त्वाचे योगदान दिले. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसायातून 1,720 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, जो मागील वर्षी 1,603 कोटी रुपये होता.
पुणे, 13 मे 2026 : पंप उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (KBL) ने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आणि आर्थिक वर्ष 2025-26 चे लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या एकत्रित महसुलात वाढ झाली असून संचालक मंडळाने भागधारकांसाठी 350 टक्के अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, मार्च 2026 अखेरच्या चौथ्या तिमाहीत एकत्रित महसूल 1,415 कोटी रुपये नोंदवला गेला असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीतील 1,281 कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे 11 टक्के वाढ झाली आहे. याच कालावधीत कंपनीचा करपूर्व नफा (PBT) 147 कोटी रुपये इतका राहिला, जो मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीत 127 कोटी रुपये होता. तर करानंतरचा नफा (PAT) 104 कोटी रुपये नोंदवला गेला असून, मागील वर्षी तो 112 कोटी रुपये होता.
आर्थिक वर्ष 2025-26 ची कामगिरी
पूर्ण आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीचा एकत्रित महसूल 4,538 कोटी रुपये राहिला. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये हा आकडा 4,492 कोटी रुपये होता. पूर्ण वर्षातील करानंतरचा नफा (PAT) 361 कोटी रुपये नोंदवला गेला, जो मागील आर्थिक वर्षात 403 कोटी रुपये होता. कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रति समभाग 7 रुपये (350%) अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. यासाठी भागधारकांची मंजुरी आवश्यक राहणार आहे.
नवीन कामगार संहितेचा परिणाम
चौथ्या तिमाहीत भारत सरकारने अधिसूचित केलेल्या नवीन कामगार संहितेमुळे कंपनीने 25.8 कोटी रुपयांचा अपवादात्मक खर्च (Exceptional Item) नोंदवला आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या खर्चाचा एकत्रित परिणाम 41.7 कोटी रुपये इतका झाला. कंपनीने हा खर्च निवृत्तीनंतरच्या लाभांशी संबंधित एकदाच होणारा खर्च असल्याचे स्पष्ट केले आहे.
Related Posts
वार्षिक सर्वसाधारण सभा 31 जुलैला
कंपनीची 106 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) 31 जुलै 2026 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून आयोजित केली जाणार आहे.
कंपनीबाबत माहिती जाणून घ्या..
किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ही 1888 मध्ये स्थापन झालेली आणि 1920 मध्ये नोंदणीकृत कंपनी असून किर्लोस्कर समूहाची मूळ कंपनी मानली जाते. पाणीपुरवठा, ऊर्जा प्रकल्प, सिंचन, बांधकाम, तेल-गॅस, सागरी आणि संरक्षण क्षेत्रासाठी फ्लुइड मॅनेजमेंट सोल्यूशन्स पुरवण्यात कंपनी आघाडीवर आहे. कंपनी औद्योगिक, कृषी आणि घरगुती पंप, व्हॉल्व्ह आणि हायड्रो-टर्बाइन्सचे उत्पादन करते.
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

