नसरापूर अत्याचार प्रकरण : पुण्यात चिमुकलीला न्यायासाठी मूक मोर्चा, आरोपीला कठोर शिक्षेची मागणी

बालगंधर्व चौक ते डेक्कनपर्यंत शांततामय मोर्चा; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी

 

Pune Silent March पुणे, १० मे : नसरापूर येथे अल्पवयीन चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून, रविवारी पुण्यात या घटनेच्या निषेधार्थ मोठा मूक मोर्चा काढण्यात आला. समस्त पुणेकर नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोर्चात मुलीच्या कुटुंबीयांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

 

Land Titling Act Maharashtra। जमीन व प्रॉपर्टी वादांना ब्रेक? महाराष्ट्रात येतोय नवा कायदा   

 

 

बालगंधर्व चौकातून सुरू झालेल्या या मूक मोर्चाची सांगता डेक्कन येथील स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाजवळ करण्यात आली. सहभागी नागरिकांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. तसेच “चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे”, “आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे” आणि “आम्हाला सुरक्षित वातावरण हवे” अशा आशयाचे फलक हातात घेतले होते.

 

मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. “आम्हाला केवळ योजनांची घोषणा नको, तर मुलींसाठी सुरक्षित समाज हवा,” अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली.या मोर्चात अभिनेते प्रवीण तरडे, विश्वजित देशपांडे, ऋणाल कुलकर्णी, शेफाली वैद्य, धीरज जोशी, ऋषिकेश सुमंत आणि किशोर पोकळे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “हा मोर्चा कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून समाज अजूनही संवेदनशील आणि जिवंत असल्याचा संदेश देण्यासाठी आहे. केवळ आमच्या मुलीसाठी नव्हे, तर अशा सर्व पीडितांना न्याय मिळावा यासाठी नागरिक एकत्र आले आहेत.” मोर्चाच्या शेवटी घटनेच्या निषेधार्थ प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. नागरिकांनी सरकारने महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

 

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झालेल्या या मोर्चात महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात निषेधाचे फलक, मेणबत्त्या आणि मोबाइलची टॉर्च घेऊन नागरिकांनी पीडित चिमुरडीला श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण मोर्चादरम्यान कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली नाही. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या या मोर्चातून नागरिकांनी न्यायाची मागणी लावून धरली.
मोर्चादरम्यान “मुलींना सुरक्षित वातावरण द्या”, “अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे” अशा आशयाचे फलक सहभागींच्या हातात दिसत होते. आयोजकांनी हा मोर्चा कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक हेतूने नसून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.
या आंदोलनातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे पीडित चिमुरडीचे आई-वडीलही या मोर्चात सहभागी झाले होते. आपल्या मुलीला गमावल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मोर्चाच्या शेवटी पीडितेच्या वडिलांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना भावनिक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
“आज येथे लोक केवळ माझ्या मुलीसाठी जमलेले नाहीत, तर प्रत्येक त्या मुलीसाठी उभे आहेत, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांसाठी सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. अशा आरोपींना तातडीने आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

Local ad 1