Land Titling Act Maharashtra। जमीन व प्रॉपर्टी वादांना ब्रेक? महाराष्ट्रात येतोय नवा कायदा
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
Land Titling Act Maharashtra पुणे, राज्यात येत्या जुलै महिन्यापासून ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ लागू करण्यात येणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या कायद्यामुळे राज्यातील नागरिकांच्या मालमत्तेला निश्चित प्रॉपर्टीचा दर्जा मिळणार असून, ती जागतिक स्तरावर आर्थिकदृष्ट्या वापरणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात जुलैपासून ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात दिली.

