आसाराम बापूच्या भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

पुणे : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू तुरुंगात आहे. 2013 मध्ये जोधपूरमधील आश्रमात १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर आसारामच्या भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण होते. काळया फिती लावून शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मुकमोर्चा काढला. जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. (Devotees of Asaram Bapu took out a silent march in Pune)

 

असुमल हरपलानी उर्फ आसाराम बापू हा बलात्कार प्रकरणी आमरण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्याच्या अटकेला ३० ऑगस्टला ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक कोर्ट मधून तातडीने न्याय मिळावा या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती ( पुणे ) साधक मंडळीतर्फे पुण्यात मंगळवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Devotees of Asaram Bapu took out a silent march in Pune)

 

 

पुणे आणि लगतच्या जिल्हयातून आलेले सुमारे ५ हजार आसाराम भक्त या मूक मोर्चात सहभागी झाले होते. काळया फिती बांधून शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर सकाळी साडेअकरा वाजता मूक मोर्चाला प्रारंभ झाला. साधकांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. सर्वांनी सफेद कपडे परिधान करून दंडाला काळया फिती लावल्या होत्या आणि हातात भगवे ध्वज घेतले होते. (Devotees of Asaram Bapu took out a silent march in Pune)

 

 

 

‘बापूजी को रिहा करो’, ‘संत न होते तो जल मरता संसार’, ‘नही सहेंगे अत्याचार, झूठे आरोपोंका हो बहिष्कार’ अशा अनेक प्रकारच्या घोषणांचे फलक साधकांनी हाती घेतले होते. न्यायालयीन प्रक्रिया संथ गतीने चालत असून, न्याय मिळण्यात विलंब होत आहे, याची शासन, समाज आणि न्यायालयाने दखल घ्यावी, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे. शनीवारवाडा, लाल महाल,फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालून राष्ट्रपतींसाठीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

Local ad 1