पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र उर्फ बाप्पु मानकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनीही उमेदवारी अर्ज सादर केले. (raghavendra bappu mankar nomination pune ward 25)
या प्रसंगी माजी नगरसेवक दिलीप काळोखे, माजी नगरसेविका गायत्री खडके, भाजपा कसबा विधानसभा अध्यक्ष अमित कंक, प्रभाग क्रमांक २५ चे अध्यक्ष सुनील रसाळ यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या नऊ ते दहा वर्षांत पक्ष संघटनेत विविध पदांवर काम करताना प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. त्या कामाची दखल घेत पक्षाने उमेदवारी दिली असून, या संधीचे सोने करणार असल्याचा विश्वास बाप्पु मानकर यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक २५ मधील ब गटातून बाप्पु मानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
पुण्यातील पहिल्या २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या असंख्य तक्रारींचे निवारण केल्यामुळे बाप्पु मानकर हे प्रभागात परिचित नाव आहे. तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमधील त्यांचा व्यापक जनसंपर्कही या उमेदवारीसाठी महत्त्वाचा ठरला आहे.
प्रभागातील जनता जाणती असून, भाजपने देश, राज्य आणि पुणे शहरात केलेल्या सर्वांगीण विकासाच्या पाठीशी नागरिक ठामपणे उभे राहतील आणि प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
❓ प्रश्नोत्तर (FAQ)
प्रश्न 1 : राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला?
उत्तर : त्यांनी पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रश्न 2 : राघवेंद्र बाप्पु मानकर कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत?
उत्तर : ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अधिकृत उमेदवार आहेत.
प्रश्न 3 : उमेदवारी अर्ज दाखल करताना कोण कोण उपस्थित होते?
उत्तर : आमदार हेमंत रासने, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, गायत्री खडके, अमित कंक, सुनील रसाळ यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रश्न 4 : प्रभाग २५ मधून भाजपचे इतर उमेदवार कोण आहेत?
उत्तर : स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रश्न 5 : बाप्पु मानकर यांची ओळख कशामुळे आहे?
उत्तर : २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी सोडविणे आणि गणेश मंडळांमधील सक्रिय जनसंपर्कामुळे ते प्रभागात परिचित आहेत.

