Pune Ring Road Construction Starts। भूमिपूजनला बगल देत पुणे रिंग रोडच्या कामाला सुरुवात
पुणे : पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे – State Road Development Corporation (एमएसआरडीसी) साकारण्यात येत असलेल्या बाह्य रिंगरोडच्या कामाला अखेर भूमिपूजना विनाच सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर रिंगरोडचे भूमिपूजन होईल, अशी चर्चा सुरु होती. परंतु भूमिपूजनाला बगद देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामासाठी नऊ कंपन्यांना कार्यादेश देण्यात आले आहेत. सर्व ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सुत्रांनी दिली. (pune ring road project construction start)



