...

Pune Traffic Update | पुणे ग्रँड टूर स्टेज-4 सायकल स्पर्धेमुळे शहरात मोठे वाहतूक बदल; शाळांना सुटी

Pune Traffic Update | पुणे : पुणे ग्रँड टूर स्टेज-4 सायकल स्पर्धा शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी शहरातील 58 किलोमीटरच्या मार्गावरून होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल केले असून, स्पर्धेच्या दिवशी पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

हे ही वाचा : पुण्याचे महापौर टिळेकर, तापकीर, देशपांडे की आणखी कोण? । Pune Mahapaur News Marathi

बालेवाडी ते बालगंधर्व असा स्पर्धेचा मार्ग
ही 95 किलोमीटर लांबीची सायकल स्पर्धा शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथून सुरू होणार असून, पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बालगंधर्व रंगमंदिर येथे तिचा समारोप होणार आहे. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

 

हे ही वाचा : दहावी–बारावीच्या परीक्षेत कॉपी? एक चूक आणि संपूर्ण परीक्षा केंद्र रद्द !

नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन
स्पर्धेच्या मार्गावर कोणतेही वाहन उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी व प्रेक्षकांनी बॅरिकेड्स व स्टॉपलाईनच्या मागेच थांबून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.

मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
* 12 पोलिस उपायुक्त
* 19 सहायक पोलिस आयुक्त
* 78 पोलिस निरीक्षक
* 243 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक
* 4,381 पोलिस अंमलदार

दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद राहणारे प्रमुख रस्ते
बालेवाडी – पाषाण – विद्यापीठ – एस.बी. रोड – कर्वे रोड – शनिवार पेठ – मंडई – लाल महाल – कॅम्प – एम.जी. रोड – घोरपडी – शनिवारवाडा – जंगली महाराज रोड – बालगंधर्व चौक) एकूण 29 प्रमुख मार्ग आणि त्यांना जोडणारे उपरस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

पर्यायी मार्ग व मेट्रो वापरण्याचे आवाहन

या काळात नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा किंवा मेट्रोचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच बालगंधर्व रंगमंदिर येथे समारोप असल्याने जंगली महाराज रोड कार्यक्रम संपेपर्यंत बंद राहणार आहे. नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांनी पूर्वनियोजन करून कामकाज स्पर्धेपूर्वी किंवा नंतर करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


❓ प्रश्न–उत्तर

प्रश्न 1 : पुणे ग्रँड टूर स्टेज-4 सायकल स्पर्धा कधी आहे?
👉 ही स्पर्धा शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.

प्रश्न 2 : पुण्यात कोणत्या वेळेत रस्ते बंद असतील?
👉 दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील.

प्रश्न 3 : सायकल स्पर्धेमुळे शाळांना सुटी आहे का?
👉 होय, पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

प्रश्न 4 : नागरिकांनी वाहतुकीसाठी काय करावे?
👉 पर्यायी रस्ते किंवा मेट्रोचा वापर करावा, तसेच स्पर्धेच्या मार्गावर वाहने उभी करू नयेत.

Local ad 1