...

सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश : प्रभाग २२ मध्ये काँग्रेस उमेदवारांची चमनशाह दर्ग्यात चादर अर्पण

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराची सुरुवात सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देत केली. काँग्रेस उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश रमेश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख यांनी काशेवाडी येथील हजरत चमनशाह दर्ग्यात* जाऊन चादर अर्पण करत सामूहिक दर्शन घेतले.या वेळी सर्वधर्मीय समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजातील महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करत जाहीर पाठिंबा दर्शविला. (prabhag 22 congress candidates chamanshah dargah pune election)

 

QR कोडपासून वचननाम्यापर्यंत ! सनी निम्हण यांचा लोकसहभागातून विकासाचा फॉर्म्युला

यानंतर झालेल्या पदयात्रेदरम्यान काशेवाडी परिसरातील हातगाडी, भाजीपाला विक्रेते तसेच पथारी व्यावसायिकांशी उमेदवारांनी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. स्थानिक नागरिकांशी मुक्त संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. या पदयात्रेत मुस्लिम महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. काँग्रेस पक्षाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर येत उमेदवारांना मनोभावे आशीर्वाद दिले.

या पदयात्रेत माजी राज्यमंत्री रमेश बागवे, विठ्ठल थोरात, बाकेर बागवे, दयानंद अडागळे, हुसेन शेख, राजू मोरे, मोहन माने, दिलीप कांबळे, हुसेन हमजू शेख, रफीक पठाण, दीपक गायकवाड, जाहिदा शेख, सुनील शेंडगे, मारुती कसबे, बापू कसबे** यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Local ad 1