...

PMC Election Result Live : पुण्यात मतदान घटले ; निकालातून कोणाला बसणार धक्का !

 

PMC Election Result Live पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा मतदानाचा टक्का घटल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी पार पडलेल्या मतदानात ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी सरासरी ५२.४२ टक्के मतदान झाले. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत हेच मतदान ५५.५६ टक्के होते. यामुळे यंदा सुमारे ३ टक्क्यांहून अधिक घट नोंदवली गेली आहे. (pmc election result live pune mahaparika nivadnuk)

 

Pune Municipal Election 2026 । ईव्हीएम बंद, शाई पुसली, बोगस मतदान! पुणे निवडणुकीत मोठा गोंधळ !

 

 

सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर अंतिम मतदान टक्केवारी जाहीर करण्यासाठी प्रशासनाला मध्यरात्री दोन वाजेपर्यंत वेळ लागला. कमी मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार, हे आज (शुक्रवार, १६ जानेवारी) होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून पहिला निकाल दोन तासांत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

१६३ जागांसाठी आज निर्णय

पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील एकूण १६५ जागांसाठी ही निवडणूक झाली आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष असे १,१५५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ४१ पैकी ४० प्रभाग चार सदस्यांचे, तर प्रभाग क्रमांक ३८ (बालाजीनगर–आंबेगाव–कात्रज) हा पाच सदस्यांचा आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ३५ मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने प्रत्यक्ष मतदान १६३ जागांसाठी झाले आहे.

 

व्हिडीओ : “मतदान करून बाहेर पडताच बोट पुसलं ! धायरीत शाई घोटाळा उघड”

 

कमी मतदानाचा राजकीय परिणाम काय?

शहरातील काही भागांत मतदारांचा उत्साह कमी दिसून आला. ईव्हीएम बंद पडण्याच्या तक्रारी, मतदार यादीतील गोंधळ, ओळखपत्रांबाबतचे प्रश्न आणि एकूणच उदासीनता याचा मतदानावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. पारंपरिकदृष्ट्या कमी मतदानाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसतो की विरोधकांना फायदा होतो, हे चित्र आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. संपूर्ण पुण्याचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले असून, पुणे महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार याचा निर्णय काही तासांत होणार आहे.

 

 

 

 

Local ad 1