देगलूरमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का, कोणाला देणार धक्का !
देगलूर : काँग्रेस आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केलेली देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Deglur Assembly constituency by-election) रवाविरी मतदान झाले. या निवडणुकीत सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आता 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आता कार्यकर्ते अकडेमोडीत रंगले आहेत. दरम्यान, 2019 मध्ये 61 टक्के मतदान झाले होते. तर आता सुमारे 3 तीन टक्क्यांनी वाढले म्हणजेच 64 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला देणार धक्का हे सोमवारी स्पष्ट होईल. (Who will be shocked by the increased turnout in Deglaur?)
देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजप (Congress-BJP) या दोन पक्षांत प्रमुख लढत झाली. त्यात बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारानेही रंग भरला. वंचितच्या प्रचारामुळे काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या निवडणुकीच्या प्रचारात मोठी फौजच उतरवली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंढे, नवाब मलिक, एच. के. पटेल यासह इम्रान प्रतापगढी, अनिरुद्ध बनकर यांनाही काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार केला आहे.तर अशोक चव्हाण देगलूरमध्येच तळ ठोकून होते. (Who will be shocked by the increased turnout in Deglaur?)