नांदेड, : नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यंदा नव्याने पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा व भावनिक उपक्रम राबवला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाच्या प्रारंभाला खास बनवणार आहे. (nanded zp he patra 2035 school memories initiative)
महाराष्ट्रात जिल्हा परिषद गट कुठे सर्वाधिक, कुठे कमी? तुमच्या जिल्ह्यात किती जाणून घ्या !
१६ जूनपासून शाळा सुरू होत असून, पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला “आठवणींचा फॉर्म” देण्यात येणार आहे. या फॉर्ममध्ये शाळेचे नाव, तालुका, विद्यार्थ्याचे नाव, आई-वडिलांची नावे, विद्यार्थ्याने लिहिलेले पहिले मराठी व इंग्रजी अक्षर, पहिली संख्या, स्वतःचे विचार आणि एक छायाचित्र अशी माहिती संकलित केली जाणार आहे.
या फॉर्मवर “हे पत्र २०३५ ला उघडून पहा आणि आमची आठवण करा…” असा खास संदेश देण्यात आला आहे. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर, विद्यार्थी हा फॉर्म उघडून आपल्या शालेय जीवनातील पहिल्या दिवसाच्या गोड आठवणींना उजाळा देणार आहेत. (nanded zp he patra 2035 school memories initiative)
एअर इंडिया विमान अपघात : 242 पैकी 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकमेव प्रवासी बचावला
हा फॉर्म शाळा किंवा पालकांकडे सुरक्षित ठेवला जाईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये शाळेशी भावनिक नातं निर्माण करतो, शिक्षण प्रक्रियेविषयी आत्मीयता वाढवतो आणि शिक्षणाची गोडी टिकवतो. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा हा सर्जनशील उपक्रम समाजातही कौतुकास पात्र ठरत आहे.