ब्रेकिंग न्यूज । नांदेड जिल्ह्यातील शाळांची पुन्हा घंटा वाजणार

नांदेड : शाळा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार आता नांदेड जिल्ह्यातील शाळा दोन टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले आहेत. (Breaking news । School bells will ring again in Nanded district)

 

 

भिषण अपघात । मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भिषण अपघातात पाच ठार

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना रुग्ण आढळत असले तरी, रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शाळा पुन्हा सुरू करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार करून महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. (Breaking news । School bells will ring again in Nanded district)

 

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या इयत्ता 9 वी ते 12 च्या शाळा सुरु करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली होती. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता दिनांक 31 जानेवारी पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयना 5 वी ते 8 वीच्या तसेच दिनांक 07 फेब्रुवारी पासून इयत्ता 1 ली ते 4 थीच्या शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Breaking news । School bells will ring again in Nanded district)

Local ad 1