पालकांनो मुलांसोबत उन्हाळी सुट्टीचा असा करा सदुपयोग ; मुख्याध्यापकाचे पत्र (Headmaster letter) व्हायरल, प्रत्येक पालकांनी वाचावे असे पत्र
summer vacation 2023 । सध्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या (summer vacation 2023) लागल्या आहेत. या सुट्ट्यांचा सदुपयोग करण्यासाठी वेगवेगळे नियोजन झाले आहेत. परंतु या काळात पालकांचे कर्तव्य काय आहेत. पलाक मुलांवर चिडचिड करतात, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करातात, अशा अनेक गोष्टी घडतात. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या शिवनगर (डोंगरगण) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक (Shivnagar (Dongargan) Zilla Parishad Primary School Principal) यांनी पालकांनी मुलांसबोत सुट्टीचा सदुपयोग कसा करावा, या काळात मुलांसबोत कसे वागावे, त्यांचे कोणते लाढ पुरवावेत, अशा एकूण 17 मुद्दे असलेले पत्र (Headmaster letter) सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल (Viral letter) झाले आहे. (Parents, make the most of your summer vacation with your kids)
Related Posts
काय आहे पत्रात जाणू घ्या..
- मुलांसोबत आपले पारंपरिक खेळ खेळा (चल्लस, ठिकरीपाणी, सागरगोटे, भोवरा, गोट्या, लपंडाव, जोडपत्ते, चोरशिट्ठी, चकारी, विटीदांडू, सुरपारंब्या इत्यादी. (Parents, make the most of your summer vacation with your kids)
- आपल्या मुला-मुलींना स्वतः उपस्थित राहून पोहायला शिकवाच.
- मुलांना खेळू द्या, पडू द्या, कपडे खराब होवू द्या.
- रोज सकाळ-संध्याकाळचे जेवण आपल्या मुलांसोबत करा, अन्न वाया जावू देऊ नका, बाहेरचे खाणे टाळा.
- कपडे धुणे, वाळायला घालणे, झाडलोट करणे, दळण करणे, भाजी निवडणे अशी कामे करायला प्रोत्साहन द्या (आईला मदत करु द्या)
- शेजाऱ्यांशी जवळीक साधण्याची संधी द्या, शेजारच्या मुलांना घरी बोलवा.
- आजी-आजोबांनी जुन्या गोष्टी, गाणी नातवांना ऐकवा. भरपूर गप्पा मारा.
- तुमच्या कामाच्या ठिकाणी मुलांना घेऊन जा. तुमचे कष्ट त्यांना कळू द्या.
- आठवडे बाजार, बँक, एटीएम, यात्रा, सण, उत्सवाला मुलांना सोबत न्या. तेथील व्यवहार त्यांना कळू द्या.
- गप्प बस ! असे न म्हणता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या, त्यांना बोलते करा,
- आपल्या लहानपणीच्या आठवणी, पुर्वजांची माहिती मुलांना सांगा.
- मुलांना अद्भूत, कल्पनारम्य गोष्टी सांगा. गोष्टींचे पुस्तक घेऊन द्या.
- किमान मुलांसमोर मोबाईल वापर मर्यादित करावा
- मुलांचे सर्व हट्ट पुरविणे म्हणजे चांगले पालकत्व ही खुळचट कल्पना डोक्यातून काढून टाका. मुलांना नाही ऐकण्याची सवय लावा.
- मोबाईल खेळायला देऊ नका. त्याऐवजी नेहमी वापरातील इंग्रजी वाक्ये youtube video दाखवा. नोंदी घ्यायला लावा.
- मुलांच्या हाताला काहीतरी काम द्या. तुम्हाला येत असलेली हस्तकला त्यांना शिकवा. (Parents, make the most of your summer vacation with your kids)