zilla parishad election 2023 maharashtra : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दिवाळीत होणार

zilla parishad election 2023 maharashtra : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्व ठिकाणी प्राशसक राज आहे. परंतु आता या निवडणुका होणार असून, त्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही महत्वाचे आदेश दिले आहेत. त्यात १ जुलै, २०२३ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या वापरल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Zilla Parishad, Panchayat Samiti elections will be held during Diwali)

 

 

राज्यातील 23 महानगरपालिका (Municipal Corporation), 207 नगरपालिका (Municipality), 25 जिल्हा परिषदा (Zilla Parishad), 284 पंचायत समिती (Panchayat samiti) अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. यातूल बहुतांश संस्थाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सुमारे दोन वर्षांपासून काही ठिकाणी प्रशासक आहे.

 

 

राज्यातील जवळपास सगळ्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर प्रशासक असून, या दोन्ही ठिकाणी निवडणुका लढविण्याची तयारी इच्छुकांनी केली होती. तसेच गण आणि गट ही अंतिम झाले. त्यासोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षणही जाहीर (Reservation for the post of Zilla Parishad President announced) झाले होते. परंतु आबीसी आरक्षण आणि न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणुका लांबल्या आहेत.

 

 

रखडलेल्या निवडणुकांविषयी राज्य निवडणूक आयोगाने महत्वाची घोषणा केली आहे. त्यात त्यांनी १ जुलै, २०२३ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या (Electoral Rolls of Maharashtra Legislative Assembly) सप्टेबवर ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा /नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (Municipal Corporations, Municipal Councils/Nagar Panchayats, Zilla Parishads and Panchayat Committees) तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक / पोटनिवडणुकासाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे रखडलेल्या निवडणुका ह्या दिवाळीच्या काळात होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Local ad 1