...

महत्वाचे ! महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपरिषद प्रभाग रचना कार्यक्रम २०२५ जाहीर

prabhag rachna 2025 निवडणूक प्रक्रिया पूर्वतयारीला गती

मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी प्रभाग रचनेची प्रक्रिया आवश्यक असते. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई महानगरपालिका तसेच इतर महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. (mahanagarpalika nagarpanchayat prabhag rachna 2025)

 

 

पुणे महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेसाठी पहिल्यांदाच सॅटेलाईट व गुगल अर्थचा वापर होणार

 

मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग रचना कार्यक्रम

टप्पा कार्यवाही करणारे अधिकारी दिनांक
प्रारूप प्रभाग नकाशा प्रसिद्ध करणे आयुक्त १५ जून २०२५
प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना प्राप्त करणे आयुक्त १६ जून ते २५ जून २०२५
हरकती व सूचना यांच्यावर सुनावणी आयुक्त २६ जून ते २८ जून २०२५
अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आयुक्त २९ जून २०२५
अंतिम प्रभाग रचनेविरुद्ध अपिलांची सुनावणी विभागीय आयुक्त ३० जून ते १५ जुलै २०२५
अपिलांवरील निर्णय विभागीय आयुक्त १६ ते २० जुलै २०२५
अंतिम प्रभाग रचना अधिसूचना आयुक्त २२ जुलै २०२५
प्रभागनिहाय मतदार यादी सुधारणा आयुक्त २२ जुलै ते २० ऑगस्ट २०२५

 

 

 

mahanagarpalika nagarpanchayat prabhag rachna 2025
mahanagarpalika nagarpanchayat prabhag rachna 2025

 


इतर महानगरपालिका (अ, ब, क व ड वर्ग), नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी कार्यक्रम

  • मुंबई महानगरपालिकेसारखाच कार्यक्रम सर्व महानगरपालिका व नगरपरिषदांसाठी लागू आहे.

  • सर्व ठिकाणी अंतिम प्रभाग रचना अधिसूचना : २२ जुलै २०२५

  • मतदार यादी सुधारणा कार्यक्रम : २२ जुलै ते २० ऑगस्ट २०२५

 

पुणे : लोणावळा-मावळ पर्यटनस्थळी ३१ ऑगस्टपर्यंत बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांनी का घेतला हा निर्णय ?


महत्त्वाच्या सूचना :

  • प्रभाग रचनेच्या या वेळापत्रकात कोणतेही विलंब, सूट अथवा बदल करण्यात येणार नाही.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे वेळापत्रकानुसार पुढे घेतल्या जातील.

  • सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यावर अपवाद असतील. (mahanagarpalika nagarpanchayat prabhag rachna 2025)


📊 निवडणूक प्रक्रिया पूर्वतयारीला गती

या प्रभाग रचनेनंतर संबंधित महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांची प्रक्रिया पुढील काही महिन्यात सुरू होईल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नियोजन व बैठकींना सुरुवात केली आहे. (mahanagarpalika nagarpanchayat prabhag rachna 2025)

बातमीचा सोर्स – राज्य निवडणूक आयोगाना जारी केला आदेश 

Local ad 1