गुजरात विधानसभा निवडणुकीचा आज बिगुल वाजणार ?

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये (Gujrat) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) आज बिगुल वाजण्याची शक्यता आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission of India) पत्रकार परिषद आज दुपारी बारा वाजता होणार आहे. याच पत्रकार परिषदेत (Press Conferance) निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. (Gujarat assembly election bugle will sound today?)

 

  •  दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) निवडणुकीची तयारी केली आहे. तसेच,गुजरातची निवडणूक लढवणार असल्याचे आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) जाहीर केल्यामुळं यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.(Gujarat assembly election bugle will sound today?)

 

Bharat Jodo Yatra । राहूल गांधी नांदेडमध्ये चार दिवस मुक्कामी… राज्यात भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात किती दिवस असेल?

 

  •  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. 2 डिसेंबरला पहिल्या टप्प्यासाठी आणि 5 किंवा 6 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकते. निवडणूक आयोगाने यापूर्वीच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे.(Gujarat assembly election bugle will sound today?)

 

 

 

 

आपने जाहीर केले उमेदवारांची यादी 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत 108 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. AAP हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने गुजरात निवडणुकीसाठी 100 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. (Gujarat assembly election bugle will sound today?)

नांदेडमध्ये मोबाईल हिस्कावणाऱ्या दोघांकडून २१ मोबाईल जप्त

गुजरातमध्ये भाजप सत्तेत

2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व 182 जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने 99 जागांसह बहुमताचा आकडा पार केला होता. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. दोघांमध्ये फरक पाहिला तर केवळ 19 जागांचा फरक होता. त्यामुळे 2017 मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार सामना झाला होता.

Local ad 1