Bharat Jodo Yatra । राहूल गांधी नांदेडमध्ये चार दिवस मुक्कामी… राज्यात भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात किती दिवस असेल?

यात्रेचा मार्ग एका क्लिकवर जाणून घ्या..

Bharat Jodo Yatra । काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात पोहोचणार आहे. यात्रेच्या स्वागतासाठी नांदेड जिल्ह्यात (Nanded District) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून (Maharashtra Pradesh Congress) जोरदार तयारी केली जात आहे. राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आसलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सोळा दिवस असणार आहे. या यात्रेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. 

 

 

‘भारत जोडो’ यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात १६ दिवस असणार आहे. नांदेड ते जळगाव जामोद या (Nanded to Jalgaon Jamod) मार्गाने यात्रा मध्यप्रदेशात दाखल होईल. सुमारे ३८० किलोमीटरच्या या प्रवासात जवळपास आठ जिल्ह्यांमध्ये भारत जोडो यात्री पोहोचणार आहेत. (Bharat Jodo Yatra Rahul Gandhi stayed in Nanded for four days)

 

Bharat Jodo Yatra Rahul Gandhi stayed in Nanded for four days

कँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra in Karnataka) सहभागी झाल्या होत्या. तर प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या देखील १४ ऑक्टोबरनंतर यात्रेत राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) चालण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सध्या कर्नाटकमध्ये असलेली भारत जोडो यात्रा आज (१८ ऑक्टोबर) आंध्रप्रदेशात (Andhra Pradesh) प्रवेश करेल. तेथून पुन्हा कर्नाटकात येऊन नंतर तेलंगणात यात्रा पोहोचेल. दिवाळीच्या कालावधीत यात्रा या राज्यात असेल. त्यानंतर यात्रेचा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात देगूलर येथे प्रवेश करणार आहे. (Bharat Jodo Yatra Rahul Gandhi stayed in Nanded for four days)

 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या (Maharashtra Pradesh Youth Congress) वतीने राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे वेळापत्रक सोशल मिडियावर जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात 382 किलो मीटरचा प्रवास यात्रा करणार आहे. 7 ते 11 नोव्हेंबर ही चार दिवस यात्रेचा नांदेड जिल्ह्यात मुक्काम असेल. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातही 11 ते 15 नोव्हेंबर या कालवधित राहूल गांधी मुक्कामी असतील. वाशिम जिल्ह्यात हि यात्रा 15 नोव्हेंबर रोजी दाखल होईल, त्यानंत 16 ते 18 नोव्हेंबर अकोला जिल्ह्यात तर बुलढाणा जिल्ह्यात 18 ते 20 नोव्हेंबर म्हणजेच तीन दिवस यात्रा असणार आहे. या दरम्यान, नांदेड आणि शेगाव येथे राहूल गांधी यांची सभा होणार असल्याचे सांगण्यात आले. (Rahul Gandhi stayed in Nanded for four days)
Local ad 1