नांदेडमध्ये मोबाईल हिस्कावणाऱ्या दोघांकडून २१ मोबाईल जप्त

नांदेड : मोटार सायकलवरून (motor cycle) आलेल्या दोघांनी हिंगोली गेट (Hingoli Gate) जवळ व्यक्तीचा मोबाईल हिस्कावला (Mobile phone) त्यानंतर फिर्यादीला बाजुला ढकलून पसार झाले. आरोपिंना वजीराबाद पोलिस ठाण्याच्या (Wazirabad Police Station) गुन्हे शोध पथकाने काही तासांत अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस आली आहेत. (21 mobile phones seized from two mobile thieves in Nanded)

 

 

 

शैलेश मिलींद नरवाडे (वय 21 वर्षे) आणि राजरत्न मारोती कदम (वय 26 वर्ष) व्यवसाय मिस्त्रीकाम दोघेही राहणार अंबानगर सांगवी नांदेड यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. (21 mobile phones seized from two mobile thieves in Nanded) अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चंद्रमुनी गंगाराम इंगोले (Chandramuni Gangaram Ingole) हे फटाके घेण्यासाठी हिंगोली गेट परिसरात गेले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्याकडील मोबाईल हिसकावला. त्यावेळी इंगोले यांनी ओरोपिंचा प्रतिकार केला, झटापट करुन आरोपी पसार झाले. त्यानंतर इंगोले यांनी वजीराबाद पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानंतर वजीराबाद पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. (21 mobile phones seized from two mobile thieves in Nanded)

 

 

हिंगोली गेट ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते बसस्टैंड व चंदा सिंघ कॉर्नर याठीकाणी चालत्या मोटरसायकलवरुन अनेक लोकांचे मोबाईल हिसकावून घेतल्याची कबुली आरोपींनी दिली. दोघांच्या घराची घरझडती घेतली असता वेगवेगळया कंपनीचे सुमारे दोन लाख 34 हजार रुपये किंमतीचे 21 मोबाईल मिळून आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली 60 हजार रुपये किमतीचे मोटरसायकल असे एकुण 2 लाख 94 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे (Superintendent of Police Shri Krishna Kokate), अपर पोलीस निलेश मोरे (Additional Superintendent of Police Nilesh More), उप विभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख (Divisional Police Officer Chandrasen Deshmukh) यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जगदिश भंडरवार, दत्तात्रय निकम, संजय निलपत्रेवार,पोकॉ संतोष बेलुरोड, पोकॉ व्यंकट गंगलुवार, पोकाँ शेख ईम्रान यांच्या पथकाने केली.

Local ad 1