...

इनामदार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी १५ दिवसांच्या बाळाचा जीव वाचवला

 

पुणे : अवघ्या १५ दिवसांच्या नवजात बाळाला सतत हिरव्या (पित्तयुक्त) उलट्या होणे व तीव्र निर्जलीकरण झाल्यामुळे रविवार, १६ नोव्हेंबर रोजी इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी विभागात दाखल करण्यात आले. तात्काळ बाळाला डॉ. संदेश रनवाल यांच्या देखरेखीखाली नवजात अतिदक्षता विभागात (NICU) दाखल करण्यात आले.

 

 

प्राथमिक तपासणीनंतर करण्यात आलेल्या एक्स-रे व पोटाचा अल्ट्रासाऊंड (USG) तपासणीत बाळाला मिडगट व्हॉल्व्युलस विथ मॅलरोटेशन असल्याचे निदान झाले. या स्थितीत आतडी असामान्य पद्धतीने वळतात व त्यांचा रक्तपुरवठा बंद होण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. डॉक्टरांच्या मते, ही अवस्था तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असलेली वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असून विलंब झाल्यास आतडी गॅंग्रीनग्रस्त होण्याची शक्यता असते.

 

आतड्यांचे गंभीर नुकसान टाळण्यासाठी त्याच रात्री तातडीची शस्त्रक्रिया (इमर्जन्सी लॅपरोटॉमी) करण्यात आली. ही शस्त्रक्रिया बालशल्यचिकित्सक डॉ. आमेर इक्बाल यांनी यशस्वीरित्या पार पाडून आतड्यांचा वळण दुरुस्त केला. “नवजात बाळामध्ये हिरव्या उलट्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अशा उलट्या म्हणजे आतड्यांतील अडथळ्याचे लक्षण असू शकते आणि तातडीने तपासणी व उपचार गरजेचे असतात,” असे डॉ. संदेश रनवाल यांनी सांगितले.

 

शस्त्रक्रियेनंतरचा कालावधी आव्हानात्मक (स्टॉर्मी) ठरला. जवळपास १० दिवस बाळाला दूध सहन होत नव्हते. त्यानंतर डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक अतिशय कमी प्रमाणात दूध सुरू करून हळूहळू वाढवले. अखेर शस्त्रक्रियेनंतर २०व्या दिवशी बाळाने पूर्ण दूध सहन करण्यास सुरुवात केली.

 

“आतड्यांचा वळण दुरुस्त झाल्यानंतर खरी कसोटी सुरू होते. निर्जलीकरण टाळणे, आतड्यांचे संरक्षण करणे आणि टप्प्याटप्प्याने दूध सुरू करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते,” असे डॉ. आमेर इक्बाल यांनी सांगितले. तसेच, नवजात बाळाला हिरव्या उलट्या, सतत उलट्या, पोट फुगणे, अशक्तपणा किंवा दूध न पिणे अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी तात्काळ रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात धाव घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.बाळाला तीन आठवड्यांच्या उपचारानंतर पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले.

 

इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नवजात आपत्कालीन सुविधा :

* २४x७ आपत्कालीन व कॅज्युअल्टी सेवा

* सतत निरीक्षणासह सुसज्ज नवजात अतिदक्षता विभाग (NICU)

* बालरोग व नवजात तज्ज्ञांची २४ तास उपलब्धता

* एक्स-रे व अल्ट्रासाऊंडसह अत्याधुनिक तपासणी सुविधा

* नवजात शस्त्रक्रियांसाठी आपत्कालीन ऑपरेशन थिएटर व भूल सुविधा* शस्त्रक्रियेनंतरची क्रिटिकल केअर, नियंत्रित फीडिंग प्रोटोकॉल व द्रव-इलेक्ट्रोलाइट व्यवस्थापन.

 

Local ad 1