कोंढव्यात किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलासह दोघांना मारहाण

Pune Crime News पुणे : कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून झालेली भांडणे सोडविण्यास गेलेल्या भावाला लोखंडी कुऱ्हाडीसह लाकडी दंडक्याने जबर मारहाण झाल्याची घटना कोंढव्यात घडली आहे. (Two people including a minor were beaten up for a minor reason in Kondhwaya)

 

 

याप्रकरणी जैद बागवान,अवेज बागवान (वय 35), ईश्तीक बागवान (वय 33, रा. ब्रम्हा मॅजिस्टीक सोसायटी, कोंढवा) याच्यासह अज्ञात दहा ते बारा जणाविरुद्ध कोंढवा पोलिस स्थानकात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले असून, खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (Two people including a minor were beaten up for a minor reason in Kondhwaya)

जैनुद्दीन सलाकउद्दीन शेख, (वय 22 वर्षे रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांनी दिलेल्या फिर्यादिवरून त्यांना त्याचा पंधरा वर्षाच्या आतेभावाने  फोन करून काहीजण त्याला मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यामुळे घटनास्थळी काही लोक आतेभावाला बेदम मारहाण करत असल्याने ते सोडविण्यासाठी पुढे आले असता त्यांनादेखील लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर मारत तसेच लाकडी दंडक्याने खांद्यावर व पाठीवर जबर मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. तसेच मध्यस्थी आलेल्या रिक्षाचालक मोहसीन पटेल यालादेखील आरोपीनी मारहाण केली.

मारहाणीत मोहसीन यांच्या डोक्याला टाके पडले असून, त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी पालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. (Two people including a minor were beaten up for a minor reason in Kondhwaya)

Local ad 1