...

‘डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ मोहिमेबाबत नियम स्पष्ट करा – NRAI

१ जानेवारीला मेट्रो सेवा पहाटे ५ वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी

पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या ‘डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ मोहिमेसंदर्भात रेस्टॉरंट व हॉटेल चालकांवर नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, याबाबत अधिकृत आणि स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) – पुणे चॅप्टर कडून करण्यात आली आहे. तसेच, १ जानेवारी २०२६ रोजी पुणे मेट्रो सेवा पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवावी, अशी सूचनाही प्रशासनाला करण्यात आली आहे. (do not drink and drive rules clarification pune metro extended service)

 

फडणवीसांचा शब्द मोडला? अमोल बालवडकर भाजपातून बाहेर, राष्ट्रवादीत दाखल

 

NRAI पुणे चॅप्टरचे सह-अध्यक्ष अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांनी यासंदर्भात पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्दिकर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम तसेच उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कणदे यांना पत्र पाठवले आहे.

 

 

पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सध्या विविध माध्यमांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांच्या जबाबदाऱ्यांबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आणि व्हिडीओ प्रसारित होत आहेत. यामुळे नेमके कोणते नियम पाळायचे, कायदेशीर जबाबदारी कोणाची आणि कशा स्वरूपाची आहे, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नववर्ष साजरे करताना रेस्टॉरंट व हॉटेल चालकांनी कोणत्या नियमांचे पालन करावे, यासंबंधी एक अधिकृत परिपत्रक किंवा स्पष्ट निर्देश जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

यासोबतच, नववर्षाच्या रात्री मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी करणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी पुणे मेट्रोची सेवा पहाटे ५ वाजेपर्यंत वाढवण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. मेट्रो सेवा वाढविल्यास नागरिक खासगी वाहनांचा वापर टाळतील आणि कुटुंबीय व मित्रांसोबत सुरक्षितपणे प्रवास करण्यास प्राधान्य देतील, असा विश्वास NRAI पुणे चॅप्टरने व्यक्त केला आहे. या दोन्ही उपाययोजना राबविल्यास ‘डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ मोहिम अधिक प्रभावी होईल आणि नववर्षाच्या उत्सव काळात सार्वजनिक सुरक्षेला मोठी मदत होईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

प्रश्नोत्तर (FAQ)
‘डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ मोहिमेबाबत कोणती मागणी करण्यात आली आहे?

उत्तर : नववर्षाच्या रात्री रेस्टॉरंट व हॉटेल चालकांवर नेमक्या कोणत्या कायदेशीर जबाबदाऱ्या आहेत, याबाबत प्रशासनाने स्पष्ट आणि अधिकृत नियमावली जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी कोणी केली आहे?

उत्तर : नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) – पुणे चॅप्टरचे सह-अध्यक्ष अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांनी संबंधित प्रशासनाकडे ही मागणी केली आहे.

सध्या कोणती अडचण निर्माण झाली आहे?

उत्तर : विविध माध्यमांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात नियम मांडले जात असल्याने रेस्टॉरंट व हॉटेल चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पुणे मेट्रोबाबत नेमकी काय सूचना करण्यात आली आहे?

उत्तर : १ जानेवारी २०२६ रोजी पुणे मेट्रो सेवा पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवावी, अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे.

❓ मेट्रो सेवा वाढवल्यास काय फायदा होणार आहे?

उत्तर : नागरिक खासगी वाहनांचा वापर कमी करतील, सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडतील आणि मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकार कमी होण्यास मदत होईल.

या उपाययोजनांचा मुख्य उद्देश काय आहे?

उत्तर : नववर्षाच्या उत्सव काळात सार्वजनिक सुरक्षितता वाढवणे आणि ‘डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ मोहिम अधिक प्रभावीपणे राबवणे हा यामागील उद्देश आहे.

Local ad 1