Big Breaking News। भीमाशंकर विकास आराखड्याला मंजुरी ; हेलीपॅडसह रस्त्यांचा होणार विकास
कुंभमेळ्याच्या आधी अंमलबजावणीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
मुंबई, दि. २७ जून: श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्जेदार आणि सुनियोजित विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ₹288.17 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. (bhimashankar 288cr development project)
व्हिडीओ : पुणे भाजप शहराध्य धीरज घाटेंचा ‘वीज’ घोटाळा उघड ! ; महावितरणवर युवक काँग्रेसचा हल्लाबोल
कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन, पर्यटक व भाविकांसाठी सुविधा उभारणीसाठी हा आराखडा महत्त्वाचा आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती.
राजकारण करा, पण मर्यादा पाळा – मस्तानी प्रकरणावर खसादार मेधा कुलकर्णींचा टोला
मुख्यमंत्री म्हणाले की, “भीमाशंकरला दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक भेट देतात. या ठिकाणी इको टुरिझम, वनभ्रमण पथ, रोपवे सुविधा, हॉटेल, रेस्टॉरंट, निवास व्यवस्था, दळणवळण आणि वाहतूक मार्गांचा विकास करण्यावर भर दिला जाईल.”
यात हेलीपॅड, नवीन दुकाने, सुरक्षेसाठी पोलिस चौकी, वीज उपकेंद्र, आणि राजगुरुनगर-तळेघाट-भीमाशंकर महामार्गाचा विकास यांचा समावेश आहे.
राज्य सरकारचा ‘प्रभागराज’ ! महापालिकांच्या निवडणुकांत सत्ताधाऱ्यांचा डाव?
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विकास कामांचा सादरीकरण केलं.