...

पुण्यात ६० रस्त्यांची डीप क्लीन मोहीम | PMC Deep Clean Drive July 2025

पुन्हा सुरु होणार मोहिम

पुणे, दि. २८ जून : पुणे महापालिकेकडून शहरातील रस्त्यांना ‘चकाचक’ करण्यासाठी १ ते ४ जुलै दरम्यान डीप क्लीन मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १ प्रमुख रस्ता अशा ६० रस्त्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती केली जाणार आहे. (PMC Deep Clean Drive July 2025)

 

Big Breaking News। भीमाशंकर विकास आराखड्याला मंजुरी ; हेलीपॅडसह रस्त्यांचा होणार विकास

 

अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व विभागांमधील समन्वयाने ही मोहीम यशस्वी करण्याचे निर्देश दिले गेले. या मोहिमेमध्ये फुटपाथ दुरुस्ती, दुभाजक स्वच्छता, गवत काढणे, ड्रेनेज सुधारणा, झाडझुडप काढणे आदी कामे केली जातील.

 

दिवटे यांनी सांगितले की, “या मोहिमेचा उद्देश रस्त्यांची दीर्घकालीन देखभाल सुलभ करणे असून, नंतर त्या रस्त्यांचे मेंटेनन्सही सुलभ होईल.”  यापूर्वी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या कार्यकाळात अशीच मोहीम यशस्वीपणे राबवली गेली होती. त्यांच्या बदलीनंतर ती थांबली होती. आता पुन्हा एकदा महापालिका अधिकाऱ्यांनी ती पुन्हा सुरू करण्याचे ठरवले आहे.

 

Local ad 1