“आलाच पैसा तर नाही म्हणू नका, लक्ष्मी समजून घ्या” : आमदार अमोल मिटकरी
नांदेड (विशेष प्रतिनिधी) : देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मतदारांना अजब सल्ला दिला आहे. ते म्हणाले “भाजपचा पैसा लक्ष्मी समजून घ्या, पण मतदान काँग्रेस उमेदवारालाच द्या, असा सल्ला मतदारांना दिला आहे. त्यामुळे या वक्त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Take BJP’s money, but vote only for Mahavikas Aghadi candidate: Amol Mitkari)
देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले. परंतु, आमदार अंतपुरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे याठिकाणी पोट निवडणूक होत आहे. (Take BJP’s money, but vote only for Mahavikas Aghadi candidate: Amol Mitkari)
देगलूरकर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. राज्याचे अनेक मंत्री प्रचारात उतरले होते. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण हे तळ ठोकून होते. भाजप उमेदवारासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते प्रचारात उतरले असून, नांदेडचे खासदार प्राताप पाटील चिखलीकर यांनी जोरदार प्रचार केला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतपुरकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची सभा झाली. त्यात पैसा कोणाचाही घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा, असे आवाहन आमदार मिटकरी यांनी मतदारांना केले आहे. पंढरपूरमध्ये जी चूक मतदार राजाकडून घडली, माझी इथल्या मतदारांना विनंती आहे ती चूक येथे घडू देऊ नका. तुमचे मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक-एक कार्यालय ३० हजार कोटींचे आहे. आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही, म्हणू नका. फटाके, फराळ घ्या. भाजपाचा पैसा घ्या, पण काँग्रेस उमेदवाराला मतदान करा, असे आवाहनही अमोल मिटकरी यांनी केले. (Take BJP’s money, but vote only for Mahavikas Aghadi candidate: Amol Mitkari)
गाव जेवणाची ऑफर
भाजपा चंद्रकांत पाटील यांनीही प्रचारा दरम्यान, मतदारांना ऑफर दिली होती. ज्या गावात भाजपाला एकूण मतदानाच्या ७० टक्के मते मिळतील, तिथे माझ्याकडून गावजेवण घातले जाईल, अशी ऑफर दिली होती. त्यासोबतच, ज्या प्रभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, तिथल्या अध्यक्षांना विशेष बक्षीस देखील दिलं जाईल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली. (Take BJP’s money, but vote only for Mahavikas Aghadi candidate: Amol Mitkari)