आमदार अमोल मिटकरीच्या “त्या” विधानाचे ब्राह्मण सभेकडून निषेध

मुखेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी सांगली येथील संवाद यात्रेच्या सभेत ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. या नंतर सबंध महाराष्ट्रात ब्राह्मण सभेकडून त्याचा निषेध केला जात आहे. याचा वक्तव्याचा निषेध आज मुखेड ब्राह्मण समाजाकडून करण्यात आला. यावेळी आ. मिटकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले. (Brahmins protest against “that” statement of person Amol Mitkari)

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President of NCP Jayant Patil) यांच्या उपस्थितीत आपले मनोगत व्यक्त करत असताना आ. अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल व मुलींच्या कन्यादाना बाबत आक्षेपार्ह विधान केले. यानंतर सबंध महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष व आ. मिटकरी यांच्या विरोधात ब्राह्मण समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. ठिक – ठिकाणी अमोल मिटकरी यांचा निषेध केला जात असून, त्यांच्या पुतळ्याचे दहनही केले जात आहे. याच अनुषंगाने मुखेड तालुक्यातील ब्राह्मण सभेच्या वतीने आ. मिटकरी यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. (Brahmins protest against “that” statement of person Amol Mitkari)

 

यावेळी ॲड. धनंजय येवतीकर,ॲड.आशिष कुलकर्णी, ॲड. राजीव देवणीकर, अविनाश देशमुख, सुहास जोशी, दिनेश कुलकर्णी, सुशील पत्की, संतोष जांबकर, जय जोशी, हेमंत कुलकर्णी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (Brahmins protest against “that” statement of person Amol Mitkari)

Local ad 1