Dr.Amol Kolhe । सोशल मिडियावरील वादातून भाकरीचा प्रश्न सुटत नाही : खासदार डॉ. अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe पुणे : देशासमोरील धोरणे (पॉलिसी) कितीही लग्न सोहळे आणि दुखःत सहभागी होऊन तयार होणार नाहीत. त्यासाठी तुम्हांला संसदेत बोलाव लागेल, गरजावं आणि भांडावं लागते, तरच हे प्रश्न सुटतात. सोशल मीडियातील वादातून तुमच्या भाकरीचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा कुटुंबाकडे लक्ष द्या, असे मत शिरूर लोकसभा मतदार संघाचे  खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. (Debate in social media does not solve the problem of bread: MP DR. Amol Kolhe)

 

ज्येष्ठ पत्रकार उत्तमकुमार इंदोरे (Senior Journalist Uttamkumar Indore) लिखित पोएम म्हंजी काय रं? (What is Poem Mhanji?)या कवितासंग्रहाचे प्रकाशन खासदार डॉ.अमोल कोल्हे, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर (Chief Editor of Maharashtra Times Parag Karandikar), साहित्यिक नितीन थोरात (Literary Nitin Thorat), अ‍ॅड. रहाणे यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात शनिवारी झाले. त्यावेळी खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. (Debate in social media does not solve the problem of bread: MP DR. Amol Kolhe)

 

सोशल मिडियावर कॅमेन्ट करण्यासाठी तुमच्या विश्वासर्तेची काहीही आवश्यकता नाही, त्यामुळे ज्याला गल्लीत साधी बॅटही धरता येत नाही, असा व्यक्ती विराट कोहली कसा चुकीचा फटका मारून बाद झाला, हे सांगत असतो. अशा परिस्थितीतून तुम्ही जेंव्हा साहित्याच्या माध्यमातून ही माहिती मांडता, त्यावेळी तुमची जबाबदारी वाढते. समाजमाध्यमांवर शब्द फेकणे फार सोपं असत. परंतु त्या शब्दांची नैतिक जबाबदारी घेऊन समाजात रुजवणं ही काळाची गरज आहे, असे डॉ. कोल्हे म्हणाले. (Debate in social media does not solve the problem of bread: MP DR. Amol Kolhe)

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडीत काढली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना, शिरूर लोकसभा मतदार संघ म्हणजे माझी वतनदारी आहे, ही भावना मी मनात कशी काय ठेवू शकतो. कारण कोणतेही पद किंवा पुरस्कार असेल, या सर्वापेक्षा जो वरचढ आहे, ते म्हणजे गळात कवड्याची माळ आणि डोक्यावर टोप घालून छत्रपती शिवाजी महारांचा वसा, वारसा आणि जबाबदारी सांगणे यापेक्षा दुसरं काही मोठं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याला आपलं स्वतःच नाव दिलं नाही, असे असताना माय-बाप मतदारांनी पाच वर्षासाठी खासदार म्हणून संसदेत पाठवलं, त्याला माझी वतनदारी का समजू, असेही डॉ.अमोल कोल्हे म्हणाले.

 

सध्याची परिस्थिती ही राजकीय मधुमेह झाल्यासारखी परिस्थिती असून, आम्हांला राजकीय साक्षरतेची गरज आहे. आनंद आणि दुखाच्या प्रसंगाना आम्ही फार सोप करुन ठेवले आहे. आम्ही लोकांच्या सुख-दुखःत असतो, हे सांगण हे फार सोप स्वरूप दिलं गेलं आहे, लोकांच्या सुख-दुखःत सहभागी होणं आवश्यक आहे, ते असायलाच हवं. परंतु जेंव्हा तुम्हांला साडेबावीस लाख लोक त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खासदार म्हणून संसदेत पाठवतात, तेंव्हा देशात राबविण्यात येणारे धोरणे निश्चित करण्यासाठी तुम्ही कितीही लग्न सोहळे आणि दुखांच्या प्रसंगात उपस्थित राहून ते करुन शकणार नाही. त्यासाठी संसदेत बोलाव लागेल, गरजावे आणि भांडावे लागते, तरच हे प्रश्न सुटतात, अशा शब्दांत विरोधकांवर टीका केली.
Local ad 1