CM फडणवीस  लातूर, धाराशिव, सोलापूर दौऱ्यावर ; नेमकं कुठे-कुठे जाणार? जाणून घ्या संपूर्ण दौरा  

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, २३ सप्टेंबर रोजी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध गावांमध्ये पीक आणि पाणी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

 

मुख्यमंत्री सकाळी मुंबईहून विमानाने लातूरला रवाना होतील. लातूर विमानतळावर पोहोचल्यानंतर ते निलंगा तालुक्यातील जाऊ येथे भेट देऊन पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर औसा तालुक्यातील खरोसा येथे ते परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

 

महाराष्ट्रात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

 

 

दुपारी धाराशिव जिल्ह्यात पोहोचल्यानंतर करजखेडा येथे पाहणी केली जाईल. त्यानंतर कळंब तालुक्यातील मलकापूर येथे भेट देऊन तेथील पीक-पाणी परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री घेतील.

 

दुपारनंतर फडणवीस सोलापूर जिल्ह्यात दाखल होतील. बार्शी तालुक्यातील धानोरे येथे पाहणी केल्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे ते भेट देणार आहेत. त्यानंतर सोलापूर विमानतळावरून ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

 

गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा AI प्लॅन; 300 कॅमेऱ्यांतून गर्दीचे मॉनिटरिंग

 

 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने त्यानुसार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

लातूर : सकाळी ९.५० ते १२ वाजेपर्यंत

मुख्यमंत्री सकाळी ९ वाजता मुंबईहून विमानाने लातूरकडे रवाना होतील. सकाळी ९.५० वाजता लातूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते निलंगा तालुक्यातील जाऊ येथे जातील. सकाळी १०.५५ वाजता येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ११.३५ वाजता औसा तालुक्यातील खरोसा येथे भेट देतील.

धाराशिव : दुपारी १२.५५ ते ३.३० वाजेपर्यंत

लातूरनंतर मुख्यमंत्री धाराशिव जिल्ह्यात दाखल होतील. दुपारी १२.५५ वाजता करजखेडा येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी ३.०५ वाजता कळंब तालुक्यातील मलकापूर येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतील.

सोलापूर : दुपारी ३.५० ते ५.३० वाजेपर्यंत

धाराशिवनंतर फडणवीस सोलापूर जिल्ह्यात दाखल होतील. दुपारी ३.५० वाजता बार्शी तालुक्यातील धानोरे येथे पाहणी करतील. त्यानंतर सायंकाळी ४.५० वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे पीक-पाणी परिस्थितीचा आढावा घेतील. कारंबा येथील पाहणीनंतर मुख्यमंत्री सोलापूर विमानतळाकडे रवाना होतील. सायंकाळी ५.४० वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करून ते ६.२५ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचतील.

 

 

 

Local ad 1